राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडला ५ रौप्य व ३ कांस्य

टीम म्हसळा लाईव्ह
पदक कल्याण - गोविली येथील जीवनदीप शिक्षण संस्था यांनी सब ज्युनिअर - ज्युनिअर ( मुले - मुली ) राज्य स्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा दिनांक ३०/१०/२०२१ ते ३१/१०/२०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती , सदर स्पर्धा महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन मान्यतेने घेण्यात आली . सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील २० जिल्हा मधून अंदाजे २०० स्पर्धक सहभागी झाले होते . या स्पर्धेमध्ये रायगड च्या खेळाडूंना ५ रौप्य व ३ कांस्य पदक मिळाले . रायगड खेळाडूंच्या या यशाबाबत रायगड पॉवरलिफ्टिंग संघटनेचे श्री . गिरीष वेद , श्री . अरुण पाटकर , श्री . सचिन भालेराव , श्री . यशवंत मोकल , श्री . राहुल गजरमल आणि संघटनेचे मार्गदर्शक श्री . मारुती आडकर ( शिव - छत्रपती पुरस्कार ) यांनी आनंद व्यक्त केला आहे . रायगड खेळाडूंच्या या यशाबाबत महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग संघटनेचे सचिव श्री . संजय सरदेसाई ( शिव छत्रपती पुरस्कार ) यांनी अभिनंदन केले आहे . या खेळाडूंना स्पर्धेच्या वेळेस श्री . संतोष गावडे ( अलिबाग ) , श्री . विक्रांत गायकवाड ( खोपोली ) , श्री . समीर दरेकर ( चौक ) , श्री . महेश पाटील ( खोपोलील आणि श्री . विनायक पाटील ( खोपोली ) यांचे बहुमोल सहकार्य लाभले .

रौप्य पदक विजेते
१. अमृता भगत - ४३ किलो - ज्युनिअर
२. श्रुती मोरे - ४७ किलो सब ज्युनिअर 
३. कुणाल पिंगळे - ५३ किलो - ज्युनिअर 
४. यश गायकवाड - ९ ३ किलो सब ज्युनिअर
५. सर्वर पाटील - +१२० किलो - ज्युनिअर

कांस्य पदक विजेते
१. साक्षी जैन - ६ ९ किलो सब ज्युनिअर 
२. मयांक पवार - ९ ३ किलो - सब ज्युनिअर 
३. मृणाल पाटील - १०५ किलो - सब ज्युनिअर

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा