म्हसळा-प्रतिनिधी
दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा सण आणि किल्ला यांचे नाते अतूट आहे.किल्ले आणि त्यांचा इतिहास बालवयातच मुलामुलींना अवगत होण्यासाठी आणि घरातील वडीलधारी मंडळी मार्फत ते मनावर बिंबविण्यासाठी म्हसळा शहरात गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठाण तर्फे दरवर्षी भव्य किल्ले स्पर्धाचे स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात येत असतो.यावर्षीची ही आठवी स्पर्धा आसुन दिवाळीच्या सुट्टीत बालविद्यार्थी वर्गाचा आंनद द्विगुणीत करण्याचे महत्तम उपक्रम राबविले आहे. स्पर्धेत लहानग्या मुलामुलींच्या हाताने साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आपल्याला साक्ष देतात.छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शूर मावळे यांच्या शौर्याची साक्ष देणारे असे हे किल्ले अंगणात अनेक ठिकाणी बनवले जातात हिच परंपरा जपण्याचा प्रयत्न म्हसळ्यातील गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानने गेली आठ वर्षे जोपासली आहे. दरवर्षीप्रमाणेच या हि वर्षी आयोजित किल्ले स्पर्धेत स्पर्धकांनी मोठा सहभाग घेतला होता.स्पर्धेच्या निमित्ताने पब्जी आणि कार्टूनच्या जगात वावरणाऱ्या मुलांना शिवरायांचा इतिहास,गड-किल्ले यांची जवळून ओळख व्हावी असा प्रयत्न प्रतिष्ठानकडून केला जातोय याचे कौतुक पालकांना होत आहे.पुढिल वर्षी प्रतिष्ठानचा तालुका पातळीवर स्पर्धा आयोजित करण्याचा मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन करडे यांनी व्यक्त केला आहे.
किल्ले स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक कुमार ओम दिपल शिर्के व प्रदिप यन्नप्पा आळू (शिवनेरी) द्वितीय क्रमांक कुमारी शांभवी समीर दिवेकर व अनन्या उदय कळस (प्रतापगड) तृतीय क्रमांक नक्ष राहुल खाताते व शौर्य राहुल खताते (रायगड)च तुर्थ क्रमांक महंत रणजित बारटक्के(रायगड) पाचवा क्रमांक गौरी दुर्गेश खताते व शर्वरी संतोष खताते (रायगड)
मोठा गट प्रथम क्रमांक अनिरुद्ध संतोष कुडेकर (केंजळगड)
द्वितीय क्रमांक (विभागून) अथर्व महेश म्हशिलकर,निल दिनेश म्हशिलकर (भरतगड) आणि ओमप्रसाद दिपक सुर्यवंशी (रायगड)
तृतीय क्रमांक(विभागून)हर्ष निमेष म्हशिलकर व वेदांत विजय बोरकर(उंदेरी)आणि अलंकार रमेश म्हशिलकर व श्रवण जितेंद्र म्हशिलकर (पारोडा)
चतुर्थ क्रमांक (विभागून)विराज विजय खताते (सिंधुदुर्ग) आणि सुनिल देवमन घावट, मनिष ज्ञानेश्वर भोई, अथर्व प्रकाश वारे (शिवनेरी)
पाचवा क्रमांक (विभागून) श्रेयस शशिकांत महाडिक (प्रतापगड)आणि ओमकार उदय चोगले (रायगड) यांनी पटकावला.
सहभागी सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन करडे, संतोष कुडेकर, कौस्तुभ करडे, श्रेया करडे, तेजस माळी, समेळ सर, शुभम करडे, विशाल सायकर यांनी मेहनत घेतली.

Post a Comment