भाजपा मुळे श्रीवर्धन मध्ये सामन्यांचा ही विकास होईल.- श्री रवि मुंढे
पुष्कर रिळकर वेळास आगर
श्रीवर्धन तालुक्यात भाजपा मार्फत राबवलेल्या विकास कामंच्या उदघाटनासाठी पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर आज श्रीवर्धन तालुक्यात आले होते.याच वेळी राष्ट्रीय पेयजल योजनेतून वेळास आगर येथे ३१ लाखांची पाणी योजना सरपंच व भाजपा चे तालुका सरचिटणीस आशुतोष पाटील यांच्या प्रत्नांमुळे राबविण्यात आली आहे.या योजनेच्या उद्घानप्रसंगी आज आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सह भाजपा चे महाराष्ट्र प्रदेश सचिव रवि मुंढे ,जिल्हा अध्यक्ष ॲड महेश मोहिते, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य कृष्णा कोबनक हे उपस्थित होते.
याच वेळी वेळास ग्रामस्थांना संबोधित करताना रवि मुंढे म्हणाले की फक्त समाज घर बांधून विकास होत नसतो तर स्थानिकांची गरज बघून काम करायचा असतो असे म्हणत सत्ता धाऱ्यांवर ठीका केली.तर वेळास समुद्र किनार्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रस्तावित केला आहे पण वेळोवेळी पत्र व्यवहार करून पण ते काम महाविकास आघाडी मार्गी लावत नाही पण आम्ही आमच्या परीने प्रयत्न करून ते ही काम लवकर मार्गी लावू.तसेच श्रीवर्धन तालुक्यात भाजपा सक्रीय झाली आहे श्रीवर्धन तालुक्यात लवकरच भाजपा ची सत्ता आणू असा विश्वास तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केला.
या वेळी या कार्यक्रमा साठी मान्यवरांसह जिल्हा सरचिटणीस श्री मिलिंद पाटील,युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.जयदीप तांबुटकर, रितेश मुंढे, वेळास ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment