दिघी - पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात वरवठणे येथे भरधाव कारने ५८ वर्षीय महीलेला ठोकरले महिला जागीच ठार:दुर्देवी घटनेने तालुका हादरला
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात दिधी - पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रं७५३ F या मार्गावर वरवठणे गावा नाजिक भरधाव कारने ५८ वर्षीय महीलेला उडवल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. या बाबत मृत महिलेचा मुलगा विनायक जानू काठावळे वय ३० रा. रेवली याने अपघाताची नोद म्हसळा पोलीसात दिल्याने म्हसळा पोलीसानी गु. र. नं. ६८/२०२१ भादविस. कलम ३०४(अ), २७९, मो.वा.का. कलम १८४ प्रमाणे नोंद केली. यामध्ये आरोपी किशोर भगवान पवार वय ४०, सध्या रा.प्रभात कॉलनी महाड , मूळ रा.नेवरगाव, ता.गंगापूर जि. औरंगाबाद हा आपले मालकीचे फोर्ड कंपनीची इको स्पोर्ट कार क्रं MH06 C5459 या कारने दिवेआगर वरून महाडकडे भरधाव, अतिवेगाने, हयगयी ने जात असता वरवठणे कडून ईनायत कादरी यांचे फ्लोअर मील मधून दळण घेऊन आपले रेवली गावी जात असताना वनिता जानू कोठावळे या महीलेला कारचालकाने राँग साईडने येऊन उडविले, अपघातात वनिता कोठावळे यांचे हात, पाय व डोक्याला जोरदार गंभीर दुखापती होऊन भिषण अपघातात घटनास्थळी कोठावळे या मृत झाल्याचे सांगण्यात आले. वनिता कोठावळे यांचे पश्चात दोन मुलगे,सूना, नातवंडे असा परिवार आहे.
"वनिता कोठावळे यांचे मृत आत्म्यावर उद्या सोमवार दि.१८ रोजी सकाळी १० वा. रेवली येथील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यविधी होणार आहेत".
Post a Comment