म्हसळयातील भूमी अभिलेख कार्यालय ६५ %रिक्त पदांचा भार घेऊन करत आहे कार्य: कार्यालयातील तब्बल ११ पदे रिक्त.



ताज्या घडामोडी : म्हसळा 
म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयात विविध पदांची संख्या १८ आहे त्यापैकी केवळ ७ पदे भरली असून तब्बल ११ पदे रिक्त आसल्याची माहीती पुढे येत आहे.नव्याने उपअधिक्षक भूमी अभी लेख या रिक्त जागी आलेले वाय.जी.कातडे ह्यांच्या कडे अतीरीक्त कार्यभार तळ्याचाआसल्याने म्हसळा कराना किती टक्के सेवा मिळेल हे भविष्यात लक्षात येईल. भूमीअभिलेख कार्यालयातील रिक्त पदे पुढील प्रमाणे निमतानदार २,छाननी लिपिक १, दुरुस्ती लिपीक१, कनिष्ठ लिपीक१,भूकर मापक १,न.भू.लिपीक १, प्रति लिपिक १, दप्तर वबंद १, शिपाई ३ अशी तब्बल ११ पदे रिक्त आहेत. अपुऱ्या कार्यालयीन कर्मचा ऱ्यांमुळे  म्हसळा शहर व तालुक्यातील नागरिकांची शेतजमीन, प्लॉट मोजणीची कामे मंद गतीने होतआहेत, तसेच ग्रामीण उतारे, चतु:सीमा, फेरफार प्रकरणे, उतारे देणे, वारस लावणे, प्रॉपर्टी कार्ड काढणे आदी कामांसाठी नागरिकाना वारंवार चकरा मारूनही कामे होत नसल्याने त्यांच्या वेळेचा अपव्यय होऊन प्रवास भाड्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.तालुक्यातील आंबेत खाडीपट्टा भागातील नागरिकाना येण्या जाण्याचा एका वेळेसाठी सुमारे रू ९००/ खर्च येत आसल्याचे समजते.स्थानिक लोकप्रतिनिधी व भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन या कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

फोटो.म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयाया फोटो.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा