तळा (किशोर पितळे)
तळा येथे शेतकरी कामगार पक्षाचे आढावा बैठक ८आँक्टो.रोजी शाखा कार्यालयात भरविण्यात आली होती या बैठकीला रायगड जिल्हा चिटणीस तथा रायगड जिल्हा परिषद पक्ष प्रतोद अँड. आस्वाद उर्फ पप्पू शेट पाटील आढावा बैठकीत उपस्थित होते.त्यांचे उपस्थितीत पिटसई मुळगाव, पिटसईबौद्धवाडी, बोरभाटलाआदिवासीवाडी, खांबवली आदिवासी वाडी, महुरेबौध्दवाडी, कुंभळेकोंड, वानस्ते, बौध्दवाडी, येथीलअनेकांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हे राष्ट्रवादी पक्षाचे बालेकिल्ला समजला जात होते. याला सुरूंग लावला.शेकापचे जिल्हा परिषदेत असण्याऱ्या वर्चस्व मुळे ग्रामीण भागातील विकासकरीतअसतो याच विश्वासाने पक्ष प्रवेश केला आहेअसेकर्त्यानीसांगितले.प्रवेशकर्त्याचे जिल्हा परिषद शेकाप पक्ष प्रतोद आस्वाद(पप्पू)शेट पाटील यांनी पक्षात त्यांचे स्वागत केले.पक्ष प्रवेशाने आगामीतळा नगरपंचायतव ग्रामपंचायती निवडणूकीत शेकापला निश्चितच बळ मिळाले आहे.यावेळी तालुका चिटणीस धनराज गायकवाड, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर खरेदी विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, जिल्हा बॅंकेचे संचालक ज्ञानेश्वर भोईर, माजी चिटणीस दिपक रसाळ, लक्ष्मणबाबूशिंदे ख रवली उपसरपंच श्री.सकपाल, लहु चव्हाण, महंमदपरदेशी, कानूविचारे, गंगारामसाळवी, मारूतीआडखळे मुकुंद धामणकर चंद्रकांत तळेकर महादेव जगताप तसेच अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि तळा तालुक्यातील जनतेचे काही प्रश्न असतील ते डिसेंबर पर्यंत पुर्ण करू तुम्ही आम्हांला मदत करा आम्ही तुम्हांला मदत करू असेही ते म्हणाले तसेच गावातील कार्यकर्त्यांनी त्याकाळी स्व.प्रभाकर पाटील यांनी केलेल्या कामाचे उल्लेख केल्यामुळे मला आनंद वाटला.यावेळी तालुका चिटणीस धनराज गायकवाड म्हणाले की तालुक्यातील जनतेने पक्षावर विश्वास ठेवून अनेकांनी पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे असे मनोगत व्यक्त केले.
Post a Comment