निकेश कोकचा : म्हसळा
रायगड जिल्हा परिषद शाळा रेवळी येथील शिक्षक अरविंद बाळकृष्ण मोरे यांना जिल्हा परिषदेचा 2020-2021 या कलावधीतील आदर्श शिक्षक पुरस्कार व न्यू इंग्लिश स्कूल नेवरूळ शाळेतील क्लर्क हरिश्चंद्र कार्लेकर यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अरविंद मोरे यांनी डी एड, बीए बीएड, डीएसएम अशा पदव्या प्राप्त केल्या आहेत.1993 मध्ये त्यांची जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक पदावर नियुक्ती झाली असून रायगड जिल्हा परिषदेच्या म्हसळा तालुक्यातील रेवळी येथील शाळेत कार्यरत आहेत. स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, महाराष्ट्र निष्ठा येथे राज्य स्तरावर प्रशिक्षण घेऊन श्रीवर्धन, म्हसळा व माणगाव या तीन तालुक्यातिल शिक्षकांना सान 2019 मध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झाली होती.
मोरे सध्या वरवठणे बीआयटी चे प्रभारी केंद्र प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.तसेच सामाजिक सेवेत अग्रेसर असून ते राहत असलेल्या ओम श्री दर्शन अपार्टमेंट अध्यक्ष आहेत.ओम श्री दर्शन अपार्टमेंट तर्फे देखील मोरे यांना सत्कार करण्यात आला.
Post a Comment