तळा प्रतिनिधी
देशात कोविड१९संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात ८आँक्टो ते १४आँक्टो२०२१या कालावधीत विशेष लशीकरण मोहीम प्रत्येक गावात राबविण्यात येत असून तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करावे हे आपल्या भल्यासाठीअसूनआरोग्यप्रशासनाला विशेष सहकार्य करावे.असे तहसीलदारए.एम.कनशेट्टी यांनी केले आहे.तालुक्यातील १८ वर्षावरील लाभार्थी लोकसंख्या २२२८५असून १६८६६ नागरिकांनी प्रथम डोस घेतला उर्वरीत ५४१९लाभार्थींनी लसीकरण करूनघेण्यासाठी प्रत्येक गावात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून स्तनदा महीला,दिव्यांग व्यक्ती वयोवृद्ध यांना देखीलदेण्यात येणारआहे. तालुक्यातील तळा उप केंद्र मांदाड, महागांव परिसरातील सर्व वाड्यावस्तीतीलसर्वांनीलसीकरण करून घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेची तिव्रता रोखण्यास मदत होणार आहे. शासनाच्या आरोग्य विभागाने मिशन कवच कुंडले मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सरंपच, आशा सेविका,अंगणवाडी सेविका, मदतनीस,तलाठी, ग्रामसेवक, आशा गट प्रवर्तक,आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलीस प्रशासन एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग शिक्षक तैनात करण्यात आले आहेत. महिलासाठी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विशेषमोहीम राबविण्यात येत असून प्रत्येक गावात स्वतंत्र नियोजन करण्यात येईल.पहिला डोस पुर्ण झाल्यानंतर दुसरा डोस प्रलंबित असलेल्यांना लाभ मिळणार आहे. लसीची कमतरता नसून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोरेगांवकर यांनी आवाहन केले आहे.
Post a Comment