संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा येथे म्हसळा बॅडमिंटन क्लबने जिल्हास्तरीय पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे दि.९-१० ऑक्टो रोजी आयोजन केले होते त्यामध्ये अलिबागच्या ॲड.जुनेद घट्टे व प्रसाद सिद्दुसरे यांनी प्रथम क्रमांक ट्रॉफी व रोख रु१० हजार तर रोह्याच्या अनिरुद्ध कराळे आणि वेद कुलकर्णी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला त्याना ट्रॉफी व रोख रु ५ हजार अलिबाग च्या ओमकार मालपाणी व शुभम पाटील यांना तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले त्याना ट्रॉफी व रु १ हजार रोख असे बक्षीसाचे स्वरूप होते. 9-10 ऑक्टोबर रोजी म्हसळा बॅडमिंटन क्लब तर्फे पुरुष दुहेरी च्या बॅडमिंटन स्पर्धा म्हसळा तालुका क्रीडा संकुल येथे आयोजीत केल्या होत्या त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलीबाग, पाली,पोलादपूर,महाड,माणगाव,गोरेगाव,
रोहा,म्हसळा,दिवेआगर येथील एकूण बत्तीस संघांनी स्पर्धत सहभाग घेतला होता अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात अलिबागच्या ॲड.जुनेद घट्टे व प्रसाद सिद्दूसरे यांनी रोह्याच्या अनिरुद्ध कराळे व वेद कुलकर्णी यांच्यावर २१-१४, २१-१६, असा विजय मिळवून प्रेक्षकांची मने जिंकली.अंतिम सामन्यातील दोन्ही संघामधून प्रसाद व वेद यांनी आपल्या दमदार स्मॅश च्या जोरावर सामन्याला रोमहर्षक स्वरूप दिले व बॅडमिंटन चाहत्यांच्या मनात आपली ओळख निर्माण केली प्रथमच आयोजित केलेल्या यास्पर्धा यशस्वी होण्यासाठी म्हसळा बॅडमिंटन क्लबच्या मोहित मेहता,इमरान कादरी , समीर कादरी, यतीन करडे,साद काझी, असल कादरी, शोहेब हालडे, जोहेब हालडे, फारुख मेमन,अखलाक कादरी,रमीज, अबीद बताली,माझ,उबेद-जाहीद मोर्बा, माजीद,जोएब हळदे,गुलझार,सलमान मेमन, पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
" पालकमंत्री ना.आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रेरणेमुळे म्हसळयातील खेळाडू Indoor Court मध्ये खेळू शकले व उत्कृष्ट स्पर्धात्मक व गुणात्मक खेळाचा आनंद लुटू शकलो"
मोहित मेहता,खेळाडू म्हसळा
Post a Comment