म्हसळा -प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात मागील पंचवीस वर्षे खुंटलेल्या विकासाला गती देताना अनेक गाववाडीत जनतेला विकास कामांची गरज असताना त्या-त्या पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना आपल्या गावाचा विकास करून घेण्यासाठी पक्षनिष्ठा आड येत होती त्यामुळे इच्छा असूनही तटकरे यांचा विकास निधी नको अशी भावना झाली होती ती आता हळूहळू बदलु लागली आसुन विकासा पासुन कोसो दूर असलेल्या गावाचा विकास करून घेण्यासाठी त्या गावातील सरपंच, पदाधिकारी यांची मानसिकता आता बदलु लागली असल्याचे मत राज्य मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी खारगाव बुद्रुक येथे सामाजिक सभागृहाचे उदघाटन करताना व्यक्त केले.विधानसभा निवडणुकी पुर्वी दिलेल्या कामाचे वचनपूर्ती करताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी खारगाव बुद्रुक येथिल सामाजिक मंडळासाठी 5 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उपलब्ध निधींतून उभारण्यात आलेल्या सभागृहाचे बांधकाम ग्रामस्थांनी चांगल्या दर्जाचे केल्याचे कौतुक पालकमंत्री यांनी करताना उदघाटन करताना समाधान होत असल्याचे सांगितले.खारगाव बुद्रुक गावातील पाणी पुरवठा करणे कामी 36 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी घोषित केले.भविष्यात गावातील पाणी टंचाई निर्माण होणार नाही असे काम होणार असल्याचे सांगितले.या वेळी त्यांच्या समावेत पक्षाचे जेष्ठ नेते अलिशेठ कौचाली,तालुका अध्यक्ष समीर बनकर,तहसीलदार समीर घारे,गट विकास अधिकारी वाय.एम.प्रभे,सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,माजी सभापती उज्वला सावंत,सरपंच अनंत नाक्ती,अंकुश खडस,मनोज नाक्ती,दामोदर पांडव,महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,नाना सावंत,अनिल बसवत,सतीश शिगवण, प्रकाश गाणेकर, लहू म्हात्रे, चंद्रकांत कापरे आदी मान्यवर उपस्थित होते.खारगावखुर्द गावचे सरपंच अनंत नाक्ती हे मित्र पक्ष सेनेचे असले तरी त्यांचा तटकरे साहेबांमार्फत गावातील विकास करण्याचा ओढा व सहकार्य असल्याचा उल्लेख पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आपले मनोगतात व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून म्हसळा तालुक्यातील गाववाडी वस्तीवर लोकपयोगी विकास कामांसाठी खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे माध्यमातून व त्यांचे विकास निधीतून सुमारे 3 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्या पैकी बहुतांश विकास कामांचा उदघाटन व भूमिपूजन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.म्हसळा तालुका नियोजित दौऱ्यात म्हसळा तालुक्यातील खारगाव बुद्रुक येथे सामाजिक सभागृहाचे उदघाटन,म्हसळा शहरातील कन्याशाळा जवळील श्री राम अंगणवाडी इमारत बांधकाम भूमिपूजन,बनोटी-कातळआळी येथील सभा मंडपाचे भूमिपूजन,खरसई नवीन वसाहती मधील विज पोळचे उदघाटन, खरसई येथे नवीन साकव बांधकामाचे उदघाटन, खरसई जय हनुमान मित्र मंडळाचे सभामंडप भूमिपूजन, काळसुरी -महिला सामाजिक सभागृहाचे उदघाटनाचे कार्यक्रम पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
Post a Comment