फोटो.डॉ.मुनीम लोखंडे यांचे स्वागत व शुभेच्छा देताना मा. सभापती महादेव पाटील व अन्य
(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा येथे ग्रामिण रुग्णालय सुरु होऊन शासनाकडून मिळणाऱ्या आरोग्य सेवा या अर्धवट व तुटपुंज्या मिळत आहेत.यासाठी आम्ही कायम स्वरुपी अधिक्षक,कायम स्वरुपी वैद्यकिय आधिकारी आसावा अशी मागणी लावून धरत असतानाच जिल्हा आरोग्य प्रशासनाने म्हसळा ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय आधिकारी म्हणून कायम स्वरुपी डॉ.मुनीम लोखंडे यांची केलेली नेमणूक म्हणजे म्हसळाकरांच्या मागण्याना यश येते असेच आहे असे पारदर्शक मत शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील यानी डॉ.लोखंडे यांचे स्वागत व शुभेच्छा देताना व्यक्त केले. यावेळी त्यांचे समवेत यादव गवळी समाजाचे नेते लक्षण कांबळे,पाचगाव आगरी समाजाचे मनोज नाक्ती,अमीर रियाज कादरी, खारगाव (बु)चे सरपंच अनंत नाक्ती उपस्थित होते.म्हसळा ग्रामिण रूग्णालयासाठी एक कायम स्वरुपी अधिक्षक, आणि सेवेत असणारे वैद्यकिय आधिकारी यांची म्हसळा ग्रामिण रुग्णालय अशीच नेमणूक हवी अशी मागणी पाटील यानी लावून धरली आहे. प्रभारी आधिकारी याना स्थानिक लोकप्रतिनीधी,रुग्ण व रुग्णांचे नातलग यांचे बाबत विशेष आस्था नसते असे अनुभवात आल्याचे यावेळी पाटील यानी सांगितले यामुळे आरोग्य सेवेतील आधिकारी कायम स्वरुपी नेमणुकीचाआसावा , प्रभारी नसावा अशी मागणी पाटील सातत्याने करीत आहेत. म्हसळा ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय आधिकारी म्हणून कायम स्वरुपी डॉ.मुनीम लोखंडे यांची केलेली नेमणूक ही आमच्या मागणीची फलश्रुती आसल्याचे डॉ.लोखंडे याना शुभेच्छा देताना पाटील यानी सांगितले.रुग्णालयांत अद्यापही क्ष किरण तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक अधीपरिचारी का ,कक्ष सेवक ,आणि सफाई कामगार अशी अनेक पदे आजच्या स्थितीत रिक्त आहे.संपूर्ण रुग्णालयाची सफाई करण्या साठी पुरेसा कामगार वर्ग नेमण्यासाठी आम्ही मा.ना.आदितीताईंकडे मागणी करणार आसल्याचे उपस्थितानी यावेळी सांगितले.
Post a Comment