म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावातील कांबळे कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचे दुर्दैवी लागोपाठ निधन झाल्याने काळाचा घाला पडला आहे.
मेंदडी गाव पंचक्रोशीतील हौशी नाटक कलाकार कै.श्री.हरी लक्ष्मण कांबळे यांचे शुक्रवारी दि.01 ऑक्टोबर रोजी सकाळी 03:00 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले असून मोठ्या भावाचे निधनाचे धसका बसलेले त्यांचे छोटे बंधू कै.श्री.गोविंद लक्ष्मण कांबळे यांचे मनावर सुद्धा मोठा आघात होऊन त्यांचे सुद्धा अचानकपणे रविवारी दि.03 ऑक्टोबर रोजी रात्री 08:30 वाजता निधन झाले आहे.
कांबळे कुटुंबातील हे दोघेही भाऊ वृत्तीने अत्यंत शांत व प्रेमळ स्वभावाचे होते म्हणूनच लहानापासून मोठ्या पर्यंत प्रत्येकाला ते हवेहवेसे वाटत असत. परमार्थिक क्षेत्रात दोघांचेही चांगले स्थान होते तसेच मेंदडी ग्रामस्थांच्या कार्यात दोघांचा अत्यंत महत्वाचा वाटा असून दोन्ही भावांचा सामाजिक कार्यात देखील मोलाचा वाटा होता. तसेच गावदेवीचे ते दोघेही खेळी म्हणून सुप्रसिद्ध होते मग ते होळी सणाचे शिमग्याचे सोंग असूद्या, तमाशाचा खेळ असुद्या किंवा गुढीपाडवा कार्यक्रम असुद्या या सर्व कार्यक्रमांमध्ये विनोदी भूमिका करून लोंकांचे मनोरंजन करून लोकांची मने जिंकली आहेत.
कै.श्री.हरी लक्ष्मण कांबळे यांचे पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असे परिवार असून कै.श्री.गोविंद लक्ष्मण कांबळे यांचे पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Post a Comment