सोशल मिडीयावरील असंस्कृत भाषेबाबत केला निषेध
(म्हसळा -प्रतिनिधी)
राज्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्ती परस्थिती असताना राज्य महसूल विभागाचे सर्व तलाठी व मंडळ अधिकारी लोकसेवा करीत आहेत असे असताना ई-महाभूमी प्रकल्पाचे,राज्य समन्वय रामदास जगताप यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांचे बाबत वॉटशॉप ग्रुपवर असंस्कृत भाषा वापरल्याचा प्रकार घडला. जगताप यांनी राज्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचे बद्दल वापरलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आणि बेजबाबदारपणाचे असल्याने तलाठी संघाचे मन दुखावले ,महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने घेतलेल्या निर्णयानुसार रायगड जिल्हा तलाठी संघाने रामदास जगताप यांच्या वक्तव्याचा निदर्शने करून जाहीर निषेध केला आहे तसेच दिनांक 8 आणि 9 ऑक्टोबर 2021 रोजी काळी फीत लावुन त्यांचा निषेध नोंदविण्यात आला.म्हसळा तालुका तलाठी संघाने तहसीलदार कार्यालया बाहेर धरणे आंदोलन करून राज्य समन्वय अधिकारी रामदास जगताप यांचा जाहीर निषेध व्यक्त करून म्हसळा तहसीलदार समीर घारे यांच्याकडे निषेधाचे निवेदन दिले.निवेदनात तलाठी संघाने नमुद करताना राज्यात नैसर्गिक आपत्तीने शेतकरी व सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. नुकसानभरपाई मिळणे कामी महाराष्ट्रभर युद्ध पातळीवर शेतीचे पंचनामे चालु आहेत त्याही परस्थितीत तलाठी, मंडळ अधिकारी शासनाने प्राधान्य क्रमाने करणयास सांगितलेले ई-पीक पाहणी व मोफत ७/१२ चे वाटप करण्यात मग्न आहेत.तशा प्रकारचा संदेश महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी दिलरंप पुणे(Dilrmp pune)या ग्रुपवर शेअर केला असता सदर संदेशाबाबत जगताप यांनी तलाठी संघाला "मुर्ख " असल्याबाबत भाषा वापरल्याने त्याभाषेवर महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने आक्षेप घेत त्यांचा राज्यभर निदर्शने करून जाहीर निषेध नोंदवला आहे. निषेध व निदर्शने करून जिल्हा अध्यक्ष दत्ता कर्चे, उप विभागीय अध्यक्ष गोरखनाथ माने व तालुका अध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे नेतृत्वा खाली तहसीलदार समीर घारे यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी महसूल नायब तहसिलदार धर्मराज पाटील,मंडळ अधिकारी रवींद्र उबारे,सलीम शहा,तलाठी सुनिल भगत,गजानन गिरी,पुनम कारंडे, संदीप सोरे,स्वप्नील मांदळे,पांडुरंग कळंबे आदी तलाठी उपस्थित होते.
Post a Comment