भारताने लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा आज केला पार ४० हजार म्हसळाकरानी लसीकरणासाठी केला हात. तालुक्यात आरोग्य विभागाचे होत आहे कौतुक
संजय खांबेटे : म्हसळा
देशांत सर्वत्र लसीकरण सुरु असतानाच आज आज भारताने कोरोना लसीचा १00 कोटी डोसचा आकडा पार केला आहे.दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या देशभर केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे.आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्याचा संपूर्ण देशात जल्लोश सुरु असतानाच आज म्हसळाकरानीसुध्दा आरोग्य यंत्रणेचे जोरदार कौतुक केले.यामध्ये पं.स.सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, शिवसेनेचे तालुका प्रमुख व माजी सभापती महादेव पाटील आणि विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.म्हसळा तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामिण रुग्णालय म्हसळा,प्रा.आरोग्य केंद्र म्हसळा,मेंदडी व खामगाव येथील कर्मचा ऱ्यांचा सक्रीय सहभाग होता.त्यामध्ये प्रा. आ.केंद्र म्हसळाच्या डॉ .प्रियांका देशमुख व डॉ .नेहा पाटील यांच्या समवेत शिंदे, साय गावकर हेआरोग्य सेवक व श्रीमती काणे कर आरोग्य सहाय्यीका ,ज्योती महाडीक , गिता पाटील,रिना धनावडे याआरोग्य सेविका ,प्रा.आ. केंद्र मेंदडीच्या डॉ .पुजा डोंगरे यांच्या समवेत अरुण कोल्हे ,ढोले , हेआरोग्य सेवक व श्रीम पोटफोडे आरोग्य सहाय्यीका बेटकोळी आरोग्य सहाय्यक , श्रीमती दिवेकर ,ढांगारे , वाघमारे ,वाणी या आरोग्य सेविका यानी लसीकरणाचे नियोज न केले,प्रा.आ.केंद्र खामगावयेथे डॉ . गितांजली हंबीर व डॉ .दिपाली सरदार यांचे समवेत श्री चव्हाण ,धरत आरोग्य सेवक व श्रीम सारंगे आरोग्य सहाय्यीका श्रीम.खैरे शिताळे,भगत, आरोग्य सेविका इ . कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे उत्कृष्ट नियोजन केले.ग्रामिण रुग्णालय म्हसळे येथे डॉ.महेश मेहता,डॉ.मुनिम लोखंडे,यांचे नियोजना मध्ये श्रीमती बांदेकर,प्रेरणा पवार,पुष्पा वारीसे,सायली केळस्कर,शितल लेडे, प्रियंका पाटील या अधीपारीचारिकानी ग्रामिण रुग्णालयातील रुग्ण सांभाळत लसीकरणांत उत्कृष्ट नियोजन केले होते या सर्व तांत्रिक मंडळीनी आजपर्यंत सुमारे २७७ दिवस लसीकरणात सहभाग घेतला. यामध्ये दिं.७ ऑक्टोंबर २०२१ ते १४ ऑक्टोंबर मिशन कवच कुंडल असाही लसीकरण सप्ताह यशस्वी पणे पार पडला, यामधे प्रा.आ.केंद्र म्हसळाच्या डॉ .प्रियांका देशमुख व डॉ .नेहा पाटील यांच्या टिमने सर्वात जास्त लसीकरण केल्याचे ता.आ. अ. डॉ. प्रशांत गायकवाड यानी सांगितले.
"राज्यातआणि जिल्ह्यातआता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. आजचा दिवस भारतासाठी भाग्याचा आहे"
महादेव पाटील, मा.सभापती पं.स. म्हसळा.
Post a Comment