श्रीवर्धन पोलीस ठाणे अंतर्गत विद्यार्थिनींना महिला सक्षमीकरण व महिला अधिकारांचे धडे.

 श्रीवर्धन प्रतिनिधी तेजस ठाकूर

      सध्याच्या युगात जगत असताना महत्त्वाची गोष्ट समोर येते ती स्त्री शक्ती जागृततेची.  एकविसाव्या शतकात वाढत असलेले महिला व मुलींचे अत्याचार, छेडछाड, बलात्कार, मानसिक व शारीरिक शोषण तसेच आमिष दाखवून केलेले कृत्य या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी प्रत्येक स्त्रीने पुढाकार घेतला पाहिजे.  याबद्दल कायदेविषयक माहिती व महिला अधिकार यांची जनजागृती करण्यासाठी श्रीवर्धन पोलीस ठाणे अंतर्गत र. ना. राऊत माध्यमिक विद्यालय येथे सदरचा कार्यक्रम आयोजित केला. श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक श्रीमती गावडे यांनी विद्यार्थिनी व शिक्षिका यांना विस्तृत स्वरूपात माहिती दिली.  महिला सक्षमीकरणाची गरज लक्षात घेता महिला व मुलींनी कराटे व स्वसंरक्षणाचे धडे शिकून घ्यावेत त्याचप्रमाणे कायद्याच्या बाबी समजून घेऊन महिला अत्याचाराच्या अन्यायाला बळी पडू नये.  असे विद्यार्थिनींचे मनोबल धैर्य वाढवणारे वक्तव्य उप पोलीस निरीक्षक श्रीमती गावडे यांनी केले. सदरच्या कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, उप पोलीस निरीक्षक श्रीमती गावडे, कविता देवर्डेकर, जयेंद्र पेडवी त्यासोबत र. ना राऊत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ढाकणे गुरुजी व आदी सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा