कुणबी समाज विद्यालय म्हसाडी येथे विद्य्यार्थांना गणवेश वाटप.



तळा- किशोर पितळे

तळा तालुक्यातील महाराष्ट्र कुणबी समाज सूधारणा संघ मुंबई. संचालीत कुणबी समाज म्हसाडी येथेवाली येथीलदानशूरसामाजिक कार्यकर्ते विशाल लाड,बारशेत येथील विजय पवार यांच्या हस्ते आदिवासी गरीब गरजू विद्यार्थांना मोफत गणवेष वाटप २१आँक्टो रोजी करण्यातआले.यावेळी
अध्यक्ष नारायण पवार महाराष्ट्र कुणबी सुधारणासंघ मुंबई अध्यक्ष माधवजीआग्री,मुख्याध्यापकभांडवलकर सर,पत्रकार नझीर पठाण, हमीद म्हैसकर शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते. विशाल लाड, विजय पवार याची सामाजिक बांधिलकीची नाळ या गावाशी गेली जोडली असून शैक्षणीक साहित्य वाटपासह अन्य गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप करीत असतात.कुणबी  समाज हायस्कूल म्हसाडी तालुक्यातील पहिले एकमेव डोंगराळ व दुर्गम ग्रामीण भागात स्थापन झाले असून या भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळतआहे. त्यामुळे विद्यार्थी संख्येचा वाढता आलेख कायम आहे. सद्यस्थितीत विद्यार्थीसंख्या८५असूनआदिवासी समाजातील जवळपास ५०% विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत.त्यामुळे या पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित रहात नाहीत. संपूर्ण शिक्षण मोफत असून कोणतीही फि आकारली जात नसून फक्त परीक्षा शुल्क घेतले जाते.असे प्रास्ताविकात सह शिक्षक म्हात्रे यांनी सांगितले. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा