महापुरात मदतकार्य करणाऱ्या ३६० जंणांचा रिलीफ फाऊंडेशनने महाड येथे केला जाहीर सत्कार

फोटो : खासदार सुनील तटकरे यांचे स्वागत करतांना सिकंदर जसनाईक सोबत आमदार भरतशेठ गोगावले, नजीब मुल्ला आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत(छाया : ओंकार रेळेकर)

रिलीफ फाऊंडेशने महापुरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यां संस्था,सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करून जपली सामाजिक बांधिलकी : खा. सुनील तटकरे



महाड : ओंकार रेळेकर
रिलीफ फाऊंडेशने महापुरात देवदूत ठरलेल्याना सन्मानित करून  सामाजिक बांधिलकी जपली आहे.रिलीफ फौंडेशनसह रायगड जिल्ह्यात कोरोना,महापूर संकट काळात मुस्लीम बांधव आणि सेवाभावी संस्थांचे उल्लेखनीय काम झाले आहे.रिलीफ फौंडेशन खेडने येथे आज केलेला सन्मान हा सामाजिक कार्याची आठवण करून देणारा सन्मान आहे अशी प्रतिक्रिया रायगड लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.कोरोना संक्रमण काळ आणि महापुरात नागरिकांसाठी अहोरात्र मदतकार्य करणाऱ्या रायगड जिल्हयातील सेवाभावी संस्था,ट्रस्ट,सामाजिक कार्यकर्ते आणि वयक्तिक स्वरूपात मदत करणाऱ्या मंडळींचा जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते महाड शहरातील बुटाला सभागृह येथे रिलीफ फौंडेशन खेड यांच्या वतीने रविवारी सकाळी बी.एस बुटाला सभागृहात आयोजित करण्यात आला होता.या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना खा.तटकरे बोलत होते. 
     खा. सुनील तटकरे, आ.भरतशेठ गोगावले, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक नजीब मुल्ला, कोकण बँक उपाध्यक्ष आसिफ दादम,बशीर मुर्तुजा,माजी सभापती सिकंदर जसनाईक, महाड को-ऑपरेटिव्ह बँक संचालक काका वैष्णव, मुफ्ती मोहम्मद परकार, नाझीम दुर्दूके,महम्मद अली पल्लवकर,म्हसळा माजी सभापती नाझीम हसवारे, अली कौचाली,आसिफ हंमदूले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.रिलीफ फौंडेशन चे मुख्य आधारस्तंभ कतार येथील उद्योजक अजीम धनसे यांचे प्रतिनिधी म्हणून खास कतार येथून इशाम हंमदूले या कार्यक्रमाला उपस्थित होते तर कतार येथून सर्व सन्मानचिन्ह आणण्यात आली होती.
राजकारण, सामाजिक क्षेत्रात काम करताना आम्हाला आजपर्यंत हजारो सन्मानचिन्ह मिळाली पण आज रिलीफ फाउंडेशन मे माझा केलेला सन्मान आणि माझ्या हस्ते देवदूतांचा केलेला सन्मान माझ्या सदैव आठवणीत राहील मी हे सन्मान चिन्ह मनामध्ये जपून ठेवीन असे  गौरउदगार खा.तटकरे यांनी काढले.रोहा अष्टमी गावात दरवर्षी पुराचा धोका असायचा आज या कार्यक्रमाला येथील देशमुख उपस्थित आहेत त्यांना विचारा रोहा अष्टमी गावातील कुंडलिका नदीचे काम आम्ही अशा पद्धतीने केले आहे की मागील दोन वर्ष गावात एक थेंबही पुराचे पाणी आले नाही अशाच पद्धतीने आम्हाला महाडकरांनी थोडीशी सेवा करण्याची संधी द्यावी थोडासा सहभाग माझा घ्यावा यापुढे येणारी संपूर्ण संकटे जाऊन महाडची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक बाजारपेठ महाड शहराचे वैभव आहे शिवरायांची विचारधारा सोबतच एक महाडच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचे काम पुढच्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून होईल तसेच तुमचा सेवक आणि सेवेकरी म्हणून मी काम करत राहणार अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना दिली.
       महापुरात मदतकार्य करणाऱ्या संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आज रिलीफ फाउंडेशनने सत्कार केला या मंडळींच्या पाठीशी कौतुकाची थाप मारण्यासाठी हा सत्कार म्हणजे कौतुक कौतुकास्पद गोष्ट आहे .सामाजिक जीवनात वावरत असताना संकट काळात आपला जीव धोक्यात टाकून अनेकांनी काम केले तर कोणी जीवनावश्यक वस्तू वाटप केलेल्या या मंडळींनी अशाच प्रकारचे सामाजिक कार्य अधिक जोमाने पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांना हा कौतुक सोहळा रिलीफ फाउंडेशन मे आयोजित केला आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि यापुढे रिलीफ फाउंडेशन च्या प्रत्येक कार्यात जिथे जिथे माझे सहकार्य लागेल तिथे तिथे मी सोबत आहे असे आश्वासन महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांनी येथे बोलताना दिले व रिलीफ फाउंडेशनच्या सर्व उपक्रमाचे कौतुक केले. खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते रत्नागिरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल करता २ लाख रुपयांचा धनादेश बशीर मूर्तुझा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला महाड शहरात २०२० मध्ये  तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत ३७ लोकांचे प्राण वाचवून स्वतःचा पाय गमावलेल्या नाविद दुस्ते तरुणाला २५ हजाराचा धनादेश देण्यात आला.दुबई येथील सामाजिक कार्यकर्ते मौलाना तौसिफ अब्दुल हमीद कोंडेकर,यंग फ्रेण्ड्स वेल्फेअर शिरगाव मुंबईचे अध्यक्ष नियाज नाखवा, आवाज एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी महाड अध्यक्ष दिलदार  पुरकर, उपाध्यक्ष राहत पुरकर ,सेक्रेटरी परवेज कौचाली ,शबाना पुरकर, अजमुद्दिन धनवारे, बिरवाडी एमआयडीसी मधील मनेरम ऑरगॅनिक चे जनरल मॅनेजर नजीर सय्यद, अंजुमन दर्दमंदाने तलीम व तरक्कीम ट्रस्ट महाडचे अध्यक्ष मुफ्ती पुरकर, उपाध्यक्ष मौलाना दाऊद उमर मुरुडकर सेक्रेटरी उस्मान कारभारी मौलाना खालिद ईसाने तारीख अब्दुल सत्तार ईसाने ,म्हसळा चे सामाजिक कार्यकर्ते महम्मद पठाण,जमातुल मुस्लिमीन म्हसळा आदींसह सुमारे ३६० सेवाभावी संस्था आणि सामजिक कार्यकर्ते यांना मांन्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.रिलीफ फौंडेशनचे प्रमुख सिकंदर जसनाईक,सामाजिक कार्यकर्ते खालिद सरगुरोह,हनिफ घनसार आणि चिपळूण, खेड,महाड मधील पदाधिकारी यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हसळा येथील डॉ. मुबश्शिर जमादार यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा