रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे - स्थानिकांची मागणी
वेळासआगर-पुष्कर रिळकर
श्रीवर्धन तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील जवळपास सर्वंच मुख्य रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खराबी झाली आहे.वेळास व आदगाव ला जोडणारा मुख्य रस्ता समुद्रकिनार्या जवळुन जात असल्यामुळे या रस्त्याचे समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे खुप मोठ्या प्रमाणत नुकसान होते.या मार्गाची समुद्राच्या पाण्यापासुन संरक्षण करण्यासाठी संरक्षक भिंती आहेत. पण भरती च्या पाण्यामुळे या संरक्षक भिंतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वेळास आदगाव मार्ग हा पर्यटन दुष्ट्या महत्वाचे आहे.परंतु हा रस्ता पावसाच्या व समुद्राच्या पाण्यामुळे खचत आहे.तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.यामुळे नागरिकांचे खुप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेवून व तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत आहे.
याच बरोबर श्रीवर्धन तालुक्यला दिघी पासुन वेळास, दिवेआगर, भरडखोल मार्गे श्रीवर्धन असा जवळ पास 30 किमी चा कोस्टल रोड लाभला आहे.या कोस्टल रोड ची अवस्था अतिशय दयनीय झाली.या रोड कडे सार्वजनिक बांधकाम विभाग सोयीस्करीत्या दुर्लक्ष करत आहे.
अलीकडे टाळेबंदी हळुहळु शिथील झाली आहे व सर्व मंदिर व पर्यटनस्थळ चालु करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत त्याच बरोबर दिघी-माणगाव-पुणे या राज्यमार्गाचे काम प्रगतीपथावर असुन जवळपास पुर्ण होत आला आहे.आणि यामुळे च श्रीवर्धन, दिवेआगर,वेळास या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढताना दिसत आहे महामार्गापासुन फक्त १किमी अंतरावर वेळास समुद्रकिनारा आहे.व वेळास पासुन हाकेच्या अंतरावर आदगाव हे श्रीवर्धन तालुक्यातील प्रमुख मासेमारी केंद्र आहे.आणि यामुळेच पर्यटकांची वेळास व आदगाव ला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.
परंतु वेळास व आदगाव ला जोडणार्या रस्त्याची खड्यांमुळे चाळण झाली आहे.आणि या यामुळे स्थानिकांकडुन या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी होत आहे.याच बरोबर हेल्प ग्रुप फाऊंडेशन ने देखील याबाबत चे निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले आहे.व हे काम लवकरात लवकर पुर्ण करा अशी मागणी केली आहे.
वेळास आदगाव रस्त्याची खड्यांमध्ये माती टाकुन देखभाल सां.बा कडुन केली जाते. याच बरोबर सां.बा. विभागाच्या आखत्यारीतील सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे,त्यामुळे डांबरीकरण होऊन रस्ते झाले पाहिजेत. - श्री धवल तवसाळकर, हेल्प ग्रुप फाऊंडेशन अध्यक्ष.
Post a Comment