संजय खांबेटे : म्हसळा
श्रीवर्धन वरून भिवंडीला जाणारी भिवंडी डेपोची गाडी नं MH07C7463 या बसचा म्हसळा शहराजवळील बायपास्ट न्यू इंग्लीश जवळ अपघात होऊन अपघात झाल्याची घटना बुध. दि .२७ रोजी दुपारी ३.३० वा. घडली, गाडीमध्ये १६ प्रवासी ठाणे भिवंडी मार्गावर जाणारे होते,दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.गाडीचा ब्रेक फेल झाल्याचे ड्रायव्हर भाईदास मांगु राठोड भिवंडी डेपो यांचे लक्षात येताच समयसूचकतेने ड्रायव्हरने गाडी उजव्या बाजूचे डोंगर धसाला लावून गाडी नियंत्रणात आणल्याने गाडीचे बंफर व काच तुटली पण दैव बलवत्तर म्हणून गाडीतील सर्वच प्रवासी सुखरुप राहीले. सदर अपघाताची नोंद म्हसळा पोलिसांत मोटर अपघात १/२०२१ करण्यात आली आसून तपास पो.ना.११७९ कल्पेश नाईक सपोनी उध्दव सुर्वे यांच्या मार्गदर्शना खाली करत आहेत.
फोटो. धसला चिकटून गाडी नियंत्रणात आणल्याचे छायाचित्रांत दिसत आहे.
Post a Comment