संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निगडी गावातील
किराणा दुकानात घरफोडी केल्याची घटना सोमवार दि२५ऑक्टो. रोजी घडली. दुकान मालक दिपक देवीचंद वनगुले यानी दिलेल्या तक्रारीने म्हसळा पोलीसानी गु. र. नं७०/२०२१भा.द.वि.स. कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. वनगुले यानी निगडी मोहल्ला येथील आपल्या किराणा मालाचे दुकानाचे छप्पर वाकवून चोरटयाने दुकानात प्रवेश केला, गल्ला तोडून ४ते ५ हजाराची रोकड लंपास केल्याची तक्रार आहे.घरफोडीच्या ठिकाणी सपोनी उध्दव सुर्वे यानी तात्काळ भेट दिली तक्रारीचे स्वरुप व वर्णनावरून स.पो.नी.सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने म्हसळा पोलीस चोरट्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले. चोरीचा तपास पो.ना. सुर्यकांत जाधव करीत आहेत.
Post a Comment