म्हसळयातील बेलदार (ओड) भटका समाज एकवटणार ; शासकीय योजनांची माहीती समाजापुढे आणणार.



संजय खांबेटे : म्हसळा 
महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेचा (ओड) मेळावा सोमवार दि.१ नोव्होंबर रोजी दु.१२वा.म्हसळा सार्वजनिक वाचनालयाचे हॉल मध्ये आयोजित केला आसल्याचे हिरामण चव्हाण,म्हसळा, संजय चव्हाण,श्रीवर्धन, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष शरद चव्हाण आणि अनिल पवार यानी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.या संधीचा फायदा घेऊन श्रीवर्धन- म्हसळा तालुक्यातील बेलदार भटका समाज मोठया प्रमाणात एकत्रित होणार असल्याचे शरद चव्हाण यानी सांगितले. यावेळी लक्ष्मणराव हाके, अध्यक्ष महाराष्ट्र मागासवर्गीय आयोग ,राजू भाऊ साळुंके, प्रदेश अध्यक्ष, बाळासाहेब सानप,अमित शेडगे उपविभागीय अधिकारी,श्रीवर्धन यांचे मार्गदर्शन होणार आसल्याचे आयोजकानी कळविले आहे.यावेळी समाजातील महिलां साठी रोजगार निर्माण करण्याचे तसेच महिलांचे बचतगट गठीत करून शासनाच्या योजना राबवून आर्थिक सबल होण्यासाठी संघटनेच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. समाजातील अंध, अपंग,विधवा, परित्यक्त्या भगिनींना शासकीय मदत मिळवून देण्यासाठीही केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहीती देण्यात येणार आहे.


बेलदार समाजाला अजूनही जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, घरकुल योजना समाजापर्यंत पोहचली नाही.त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. संपूर्ण राज्यातील सर्वच जिल्हा -तालुका पातळीवर बेलदार भटका समाज मोठया प्रमाणात एकत्रित येत आसल्याचे आयोजकानी सांगितले .



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा