अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र , रायगड शाखेची मिटींग संपन्न .



टीम म्हसळा लाईव्ह
 रविवार, दि .17/10/2021  रोजी अंधश्रध्दा निर्मूलन समिती महाराष्ट्र , जिल्हा रायगड यांची मिटिंग , लायन्स क्लब हॉल नागोठणे येथे जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मिटींगला राज्य सल्लागार भाऊ सावंत , राज्य कार्यकारिणी सदस्य निलेश घरत उपस्थित होते .
मीटिंग ची सुरुवात चळवळीच्या गाण्याने झाली. नंतर सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. सुभेकर सरांनी प्रस्तावना मांडली . जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर सरांनी येणाऱ्या दोन महिन्यातील उपक्रमाविषयी माहिती दिली . जसे फटाके मुक्त अभियान , संविधान बांधिलकी महोत्सव , 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर चला व्यसनाला बदनाम करू या , या अभियानाचा आयोजन करण्याचे ठरले . तसेच या दोन महिन्यात शाखांना भेटी देणे , शाखा बांधणी करणे , सभासद नोंदणीसाठी लिंक तयार करणे आणि निवासी प्रशिक्षण शिबिर घेण्याचे ठरले.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक अंकासाठी जाहिरात व देणगी गोळा करण्यासाठी हितचिंतकांच्या भेटी घेऊन अंनिस कार्य अहवाल व दरपत्रक पोहोचवून जाहिराती गोळा कराव्यात, तसेच २०० रुपये वार्षिक वर्गणी असलेल्या वार्तापत्राची सभासद संख्या जास्तीत जास्त करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
चर्चेमध्ये जिल्हा प्रधान सचिव - संदेश गायकवाड (पेण),  जिल्हा महिला सहभाग सहभाग कार्यवाह-सुनिता देशमुख, जिल्हा युवा कार्यवाह अमित गवले ( पाली), जिल्हा बुवाबाजी संघर्ष कार्यवाह अमित निंबाळकर (पाली), नरेश पाटील ( नागोठणे अध्यक्ष), श्रीनिवास गडकरी ( पेण कार्याध्यक्ष नंदकिशोर राक्षे- रोहा कार्याध्यक्ष, दिनेश शिर्के (रोहा - प्रधान सचिव), विजया चव्हाण (नागोठणे कार्याध्यक्ष ), वसंत डाकी ( नागोठणे), चंद्रशेखर सावंत (रोहा ) यांनी सहभाग घेतला .
राज्य सल्लागार भाऊ सावंत यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र च्या कामाची माहिती दिली.
नागोठणे शाखेकडे आलेल्या बुवाबाजी फसवणूक प्रकरणाबाबत चर्चा करून पुढील कार्यवाही कशी करावी याबाबत नियोजन करण्यात आले.
 शेवटी संदेश गायकवाड यांनी आभार मानले , आणि हम होंगे कामयाब या गाण्याने मीटिंग ची सांगता झाली . या व्यतिरिक्त सदर बैठकीला प्रमोद खांडेकर (रोहा)अलिबाग, रोहा, पेण, पाली, माणगाव येथील कार्यकर्ते आणि नुकत्याच जॉईंट झालेल्या नवीन कार्यकर्त्या स्वाती मोरे (नागोठणे) इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा