म्हसळा येथील कराटे चांपीयन अभिजित कलमकरने ब्लॅक बेल्ट स्पर्धेत मिळवली पदवी : चार तालुक्यात कराटेत ठरला उत्कृष्ट :म्हसळ्यात होत आहे कौतुक
म्हसळा - प्रतिनिधी
अविनाश मोरे सर यांच्या प्रशिक्षणाने कराटे स्पर्धेत चॅपीयन झालेला म्हसळा शहरातील कुंभार आळीतील अभिजित अभय कळमकर याने महाड येथे संपन्न झालेल्या कराटे ब्लॅक बेल्ट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून अव्वल स्थान पटकावून पदवी प्राप्त केली .महाड येथे आयोजित ब्लॅकबेल्ट स्पर्धेत म्हसळा,श्रीवर्धन,महाड, पोलादपूर तालुक्यातील अभिजित कळमकर,विक्रांत खांडेकर,सिध्दी सावंत,सृतिक वाणी,धनश्री तोडणकर आणि आर्यन या सहा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत कुमार अभिजित याने उत्कृष्ट कामगिरी करून पदवी मिळवली. अभिजीत याने १ली इयत्तेत असतानाच कराटे प्रशिक्षणाला सुरुवात केली.त्याने वेळोवेळी आयोजित शालेय,तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन चांगली कामगिरी करून पदक प्राप्त केले अभिजीतला वरील यश प्राप्त करण्यासाठी त्याची आई तथा माजी सरपंच अपेक्षा कळमकर,वडील तथा कुंभार समाज युवक अध्यक्ष अभय कळमकर,समाज अध्यक्ष सुनिल अंजार्लेकर,सचिव-संतोष कुडेकर,सल्लागार सुरेश कुडेकर आणि समस्त कुंभार समाज ज्ञाती बंधुभगिनींचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.कराटे स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या सर्वच स्पर्धकांचे म्हसळा तालुक्यातील सर्वपक्षिय मान्यवर लोकप्रतिनिधी,शिक्षक आणि पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment