तळीये गावातील बाधीत अपदग्रस्ताना सावरण्यासाठी रायगड जनकल्याणचा मदतीचा हात : ग्रामस्थांकडून होत आहे कौतुक.



संजय खांबेटे : म्हसळा 
राज्यात अनेक ठिकाणी पुर ,महापूर येणे, दरड कोसळून आर्थिक व मनुष्य हनी होण्याच्या घटना त्याना सर्वच स्तरावरून मदत होणे हे प्रकार सुरु असताना महाड तालुक्यातील तळीये दरडग्रस्त गावातील नागरिकांना जनकल्याण समितीच्या वतीने आज आपुलकीने हाक मारून मदतीचा हात देऊन भविष्यात उदर निर्वाहासाठी उभे रहाण्यासाठी मदत करण्यात आली, नुकताच तळीये गावातील अपतकालीन निवारा शेडमध्ये झालेल्या कार्यक्रमाला रा.स्व.संघाचे महाड तालुका कार्यवाह श्री.नामदेवजी सुतार , विश्व हिंदू परिषदेचे प्रांत कार्यकर्ते शरदजी गांगल , महाड एमआयडिसी सिईटीपीचे उपाध्यक्ष अशोकजी तलाठी,जयेशजी छेडा,गिरीशजी पेंडसे जोशीजी उपस्थित होते. यावेळी गरजू ग्रामस्थाना ३ गायी , १ पिको शिलाई मशीन , १ नांगर , १ मृदूंग १०  टाळ , शेती आवजारांचे ३ सेट , भात कापणीचे ५२ विळे,दरडीच्या दुःर्घटनेत दुखापत झालेल्या २ जणांना उपचारासाठी रोख मदत चेकने केली गेली , अशापद्धतीने पुरग्रस्त सवाद गावी ४ जणांना गायी आणि स्वावलंबन योजनेखाली २ जणांना छोटे दुकानासाठी साहित्य घेणे कामी मदत केली.आपद्ग्रस्त भागात,जनकल्याण,रा.स्व.संघ,विश्व हिंदू परिषद करीत असलेल्या कामाचे कौतुक होत आहे.

"तळीये भागात जनकल्याण,रा.स्व.संघाचे स्वयंसेकानी ग्रामस्थांसोबत चर्चा करून, परिपूर्ण आभ्यास करून केलेले मदतकार्य आम्हाला कौतुकाचे असून, भविष्यांत ग्रामस्थ नक्कीच अनुभवातून स्वताच्या पायावर उभे रहातील.
अशोक पांडे,माजी सरपंच तळीये

फोटो : विविध अपदग्रस्ताना मदत करताना संस्थेचे पदाधिकारी

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा