म्हसळा (निकेश कोकचा)
म्हसळा शहरातील क्रांती महिला बचत गटातर्फे दिवाळीचा फराळ बनवण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच हे फराळ सामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती बचत गट अध्यक्ष सीमा जोशी यांनी दिली.
४ नोव्हेंबर रोजी हिंदू परंपरेनुसार दिवाळीचा सन साजरा करण्यात येणार असून फराळाला अनन्यसाधारण महत्व आहे.सद्ध्या धावपळीच्या युगात नोकरदार वर्ग व इतर व्यस्त नागरिकांना फराळ खाण्याची इच्छा असून फराळ बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. वाढती महागाई लक्षात घेता फराळ बनवणेही परवडत नाही.अशातच,क्रांती महिला बचत गट म्हसळा तर्फे अध्यश सीमा जोशी,उमा जोशी,भाग्यश्री दातार,अपर्णा ओंक,पल्लवी ओंक,प्रीती दातार,धनश्री फाटक,प्रियांका कळस यांनी मेहनत घेऊन साजूक तुपात चकली,चिवडा,करंजी, रवा लाडू,शंकरपाळी(गोडे),शंकरपाळी(खारे)बनवलेले वाजीव दारात ब्राह्मण आली येथे विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.
सोबत फोटो- दिवाळीचा फराळ तयार करताना क्रांती महिला बचत गटाच्या अध्यश सीमा जोशी,उमा जोशी,भाग्यश्री दातार,अपर्णा ओंक,पल्लवी ओंक,प्रीती दातार,धनश्री फाटक,प्रियांका कळस दिसत आहेत.
Post a Comment