म्हसळा महसूल कार्यालयात अनेक पदे रिक्त : नागरीकाना होतो आर्थिक भुर्दंड.



दोन नायब तहसीलदारांसह अन्य १४ पदे रिक्त
संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यातील महसुल विभागा मध्ये गेली काही वर्षे अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जास्तीचा पद भार अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांवर पडतं आहे. कामाचा ताण वाढत आसल्याकारणाने गोरगरीब लोकांची कामे वेळेत होत नाहीत.परिणामी तालुक्या तील लोकांना एका कामासाठी अनेक वेळा सरकारी ऑफिसच्या चकरा माराव्या लागत आहेत.नायब तहसीलदार,अव्वल कारकून, लिपीक ,तलाठी,शिपाई, कोतवाल अशी १६ पदे रिक्त आहेत त्यामुळे या पदांची भरती त्वरित करावी व ज्या अधिकाऱ्यांचा बदलीचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे परंतु त्यांच्या बदल्या अद्यापही झालेल्या नाहीत त्यांच्या देखील बदल्या त्वरित कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.रिक्त पदांमुळे कामे वेळेत न झाल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना वेळेबरोबर आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.त्यामुळे महसूल कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून सुद्धा होत आहे.तालुक्यात वाड्या- वस्त्यांसह ८० गावांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्ती व अपतकालीन कामाचाही अतीरीक्त ताण महसुल विभागावर असतोच.

म्हसळा तालुक्यातील रिक्त पदे
नायब तहसीलदार
१)निवडणूक नायब तहसीलदार २) संजय गांधी योजना नायब तहसीलदार
आण्णा साहेब (अव्वल कारकून)
१)संजय गांधी योजना 
आण्णा (लिपीक)   १ पद रिक्त
२) महसूल सहाय्यक  ३ पदे रिक्त
३) पुरवठा सहाय्यक १ पद रिक्त
शिपाई 
४)महसूल व संगांयोजना २ पदे रिक्त
कोतवाल
६ पदे रिक्त -आंबेत,केलटे,मेंदडी, खामगाव, म्हसळा,निगडी
म्हसळा तालुक्यात पदे रिक्त असताना वर्ग केलेल्या सेवा
१) महसूल अव्वल कारकून- माणगाव तहसील
२) महसूल सहाय्यक -श्रीवर्धन तहसील
३ ) तलाठी पाष्टी - मुरुड तालुका
४ ) तलाठी भापट - कर्जत तालुका 
म्हसळा तालुका महसूल विभागातील नायब तहसीलदार ते कोतवाल पदांपर्यंतची विविध रिक्त पदे प्राधान्याने भरावीत ह्या मागणीसाठी महाविकास आघाडीतील विविध घटक पक्ष आपापल्या प्रतिनिधी कडे पदे भरण्याची मागणी लावून धरणार असल्याचे समजते.

"जिल्ह्यातील महसूल विभागातील रिक्त पदे सम प्रमाणात भरण्यात यावीत,एका महसूली विभागातील कालावधी किमान ३ वर्ष रहावा"
महादेव पाटील, तालुका प्रमुख, म्हसळा

" रिक्त पदांचा भार कमी करण्या सोबतच तालुक्यातील वर्ग केलेली पदे तात्काळ पुर्न प्रस्थापित करून रिक्तपदे भरावित"
कृष्णा कोबनाक,भाजपा ,श्रीवर्धन मतदारसंघ

फोटो : महसुल कार्यालय. म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा