म्हसळ्यामध्ये काँग्रेसच्या मागणीला यश:प्रभाग क्र.17 ला मिळाले सार्वजनिक तीन नवीन नळ कनेक्शन




म्हसळा(निकेश कोकचा)


म्हसळा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 17 येथील बायपास परिसरात पाण्याच्या प्रश्न गंभीर झाला होता.याबाबत म्हसळा काँग्रेस ने आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे  या परिसरात सार्वजनिक तीन नवीन नळ कनेक्शन नगरपंचायत मार्फत देण्यात आले असून, चार कनेक्शन मागणी नुसार देण्यात येणार आहेत.


प्रभाग क्रमांक 17 मधील बायपास परिसरात अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या गंभीर झाली होती.नळ कनेक्शन नसल्याने येतील महिलांना पावसाळ्यात देखील डोक्यावर हंडा घेऊन जाण्याची वेळ आली होती.पाण्याच्या प्रश्नावरून म्हसळा काँग्रेस आक्रमक झाली असून,बायपास येथे नगरपंचायत मार्फत सात नवीन नळ कनेक्शन 25 ऑक्टोबर पर्यंत दिले नाही तर 26 ऑक्टोबरला तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे पत्र  म्हसळा काँग्रेस महिला शहराध्यक्षा नाझीमा मुकादम यांनी तहसीलदार म्हसळा यांना 22 ऑक्टोबर रोजी दिले होते.


शहराध्यक्षा नाजीमा मुकादम यांच्या उपोषणाच्या धमकीची दखल घेत म्हसळा नगरपंचायत मार्फत मंगळवारी बायपास रोड परिसरात सार्वजनिक नवीन तीन नळ कनेक्शन देण्यात आले.या व्यतिरिक चार नळ कनेक्शन मागणी नुसार देण्यात येतील असे लेखी आश्वासन देण्यात आले.काँग्रेस शहराध्यक्षा यांनी पाठपुरावा करून बायपास परिसरात नळ कनेक्शन आणून दिल्याबद्दल त्या परिसरातील महिलांनी त्यांचे आभार मानले.यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष बाबा हुर्झुक, काँग्रेस शहर माजी अध्यक्ष रफी घरटकर,रिझवान मुकादम,शमीम काजी,शरीफा साने,रशिदा शेख,जायदा वस्ता,फातिमा शेख,शबाना चोगले उपस्थित होते.


फ़ोटो-म्हसळा बायपास येथे नवीन सार्वजनिक नळ कनेक्शन मिळाल्या नंतर महिला शहराध्यक्षा नाजीमा मुकादम यांचे कौतुक करताना परिसरातील महिला दिसत आहेत.छाया निकेश कोकचा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा