युवाअनस्टॉपेबअहमदाबाद ही संस्था आणि गायमुख ता.तळा येथील समाज सेवक रायगड भूषण कृष्णा महाडिक यांचे होत आहे कौतुक.
संजय खांबेटे : म्हसळा
तालुक्यात कोविड -19 संसर्गाचा धोका आणि कोविड -19 लसीकरणाचे फायदे याबद्दल आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जोरदार जनजागृती सुरु आहे.तालुक्यात आज पर्यंत ग्रामिण रुग्णालय,प्रा.आ.केंद्र म्हसळा,मेंदडी,खामगाव या चार लसीकरण केंद्रामधून पाहिला व दुसरा डोस घेणाऱ्यां ची एकूण संख्या३६ हजार ५७३ झाली आहे. त्यामध्ये पाहिला डोस घेणारे २७ हजार ७९ आहेत. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ९हजार४९४ आहे. तालुक्यातून गर्भवती महिलानी लसीकरणा साठी सक्रीय व्हावे यासाठी आम्ही तालुका आरोग्य विभागामार्फत सातत्यपूर्ण जन जागृती मोहिम राबवत आहोत गर्भवती महिलांना कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याबाबत योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनवले आहे असे आरोग्य विभागा मार्फत सांगण्यात आले.तालुक्यातील लसीकरणात महिलांचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात आल्याने गुजरातमधील युवाअनस्टॉपेबल अहमदाबाद ही संस्था आणि गायमुख ता.तळा येथील समाज सेवक रायगड भूषण कृष्णा महाडिक यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा अंतर्गत सकलप येथे covid-19 लस घेणाऱ्या 57 महिलांना एक लिटर तेलाची पिशवी प्रोत्साहन म्हणून देण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य आधिकारी डॉ. प्रशांत गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, डॉ.प्रियांका देशमुख,समाज सेवक प्रा.मंगेश कदम,सिस्टर गीता पाटील, रीना धनlवडे,आरोग्य सहयक सागर सायगावकर,सफ़ाई कामगार मामा महाशिलकर ,आशा वर्कर वनिता पाटील
व अन्य उपस्थित होते.
"जगभरात व आपल्या देशांत नागरिकांनी कोव्हिड-19 च्या लशीचा डोस घ्यावा यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अशा अनेक गोष्टी केल्या जात आहेत.कृष्णा महाडिक आणि युवाअनस्टॉपेबल अहमदाबाद ह्या संस्थेने राबविलेला हा उपक्रम कौतुकाचा आहे"
डॉ.प्रियांका देशमुख, वैद्यकिय आधिकारी, प्रा. आ. केंद्र म्हसळा.
Post a Comment