मुंबई -गोवा महामार्ग मार्गी लावा ; शरद पवारांचे गडकरींना आवाहन

टीम म्हसळा लाईव्ह 
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अन्य मार्गाप्रमाणे मार्गी लावावे,असे आवाहन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांना केले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाली. ही चर्चा पुणे विमानतळावर झाली. यावेळी रखडलेल्या कामासंदर्भात 5 ऑक्टोबरला दिल्लीत बैठक होणार आहे. याबाबतची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात आता थेट शरद पवारांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे या मार्गाचे पूर्णत्वाला जाईल, अशी अपेक्षा आहे. पवार, गडकरी आणि तटकरे यांच्यात झालेल्या चर्चेवेळी कामे प्रलंबित राहण्याची कारणे आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली.

येत्या पाच तारखेला दिल्लीत महत्वाची बैठक होणार असून प्रलंबित मार्गाचा प्रश्‍न मार्गी लावला जाणार आहे. त्यामुळे गेली आठ-नऊ वर्षे रडत-खडत सुरु असलेल्या कामाला गती मिळणार आहे.
-सुनील तटकरे, खासदार

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा