मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडी झूडपे, उंच उंच गवते याची केली सफाई.
उरण प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील
उरण येथे अनेक अपघात होत आहेत व या अपघातात उरण मधील तरुणांचा नाहक बळी जात आहे. अपघाताच्या अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडी झूडपे, उंच उंच गवते.
या झाडी झूडपामुळे वळणावर अनेकदा समोरील वाहने दिसत नाहीत व त्यामुळे समोरून आलेल्या वाहनांमुळे अचानकपणे अपघात होतो. त्यामुळे अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता अपघात होऊ नये यासाठी उरण महामार्गावर खोपटा ब्रिज येथे असलेले झूडपे, गवत काढून तो परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेने केला.
त्यामुळे आज दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी या परिसरात गवत, झाडी झूडपे काढून टाकून साफसफाई करण्यात आली.
रविवार हा सुट्टीचा दिवस. या दिवशी प्रत्येक जण फिरायला जातात. मौजमजा करतात पण श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी अपघात होऊ नये म्हणून आपला अमूल्य वेळ देऊन गवत, झाडी झूडपे तोडून साफसफाई केली.
या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून अश्या प्रकारे प्रत्येक सामाजिक संस्थांनी विविध उपाययोजना केल्यास नक्कीच उरण मधील अपघात कमी होतील असे मत उरण मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष हेमंत पवार, सचिव प्रेम म्हात्रे,खजिनदार सुरज पवार, मार्गदर्शक सल्लागार सुनील वर्तक आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.

Post a Comment