मीरा क्लीनफ्युल्स् ली. अंतर्गत , म्हसळ्यात स्वयंपूर्ती प्रोड्युसर कंपनीची सुरवात
शेतकरी जमीनदाराना वरदान ठरणार प्रकल्प
(म्हसळा प्रतिनिधी)
मीरा क्लीनफ्युल्स् ली. अंतर्गत ,स्वयंपूर्ती प्रोड्युसर कंपनीचे कार्यालयाचे उद्घाटन आज म्हसळा तहसीलदार समीर घारे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्था नी रायगड जिल्ह्याचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बबनराव मनवे होते. साई सहारा कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या या भारदस्त कार्यक्रमाला गटविकासअधिकारी
वाय.एन.प्रभे,सपोनी उध्दव सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर बनकर,शिवसेनेचे महादेव पाटील,शेकापक्षाचे संतोष पाटील ,RPIचे अनंत पवार,मीरा क्लीनफ्युल्स ली व स्वयंपूर्ती प्रोड्युसर कंपनीचे संबधीत सातारा माणचे दिपक कोळपे, तळ्याचे विनायक तेलंगे, मावळचे श्रीकांत कंधारे, आलिबागचे डॉ.वटकरे,श्रावण माने, परशुराम मांदाडकर,चंद्रकांत कांबळे, भालचंद्र घाणेकर,चंद्रकांत कांबळे ,निलेश मांदाडकर व तालुक्यातील शेतकरी बहुसंखेने उपस्थित होते.यावेळी तहसीलदार समीर घारे यानी म्हसळयातील शेतकऱ्यानी मुंबईत नोकरीसाठी स्थलां तरीत होण्यापेक्षा तालुक्यात राहून शेतीला पर्याय म्हणून या प्रकल्पाचा परीपूर्ण आभ्यास करावा व सामिल व्हावे अन्य शेतीपूरक,कुक्कुटपालन,शेळीपालन, दुग्धव्यवसाय हे शेतीपूरक जोड व्यवसाय करावे आणि राष्ट्रीय उत्पन्नात भर घालावीअसे आभ्यासू मार्गदर्शन केले. यावेळी मीरा क्लीनफ्युल्स् ली. अंतर्गत ,म्हसळ्यात स्वयंपूर्ती प्रोड्युसर कंपनीचे आयोजकानी आपली कंपनी ही उर्जेच्या नूतनीकरणाचा शोध घेऊन तीचे उत्पादन करणारी संघटना आहे.
हे करीत असताना कंपनी ग्रामिण शेतकऱ्यांचे सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देणार आस ल्याचे सांगण्यात आले. उत्पादनासाठी गवत(नेपियरग्रास),जट्रोफा,शेवाळ, पाला पाचोळा यापासून शुद्ध जैव इंधन व जैविक खत निर्मीती होणार आसल्याचे सांगण्यात आले.
" ऐन सोमवारी जिल्ह्याचे कृषी व पशु संवर्धन समितीचे सभापती,तालुक्यातील सर्व प्रशासकीय आधिकारी आणि तालुक्यातील सर्वच पक्षाचे पक्ष प्रमुख एकाच व्यासपीठावर येऊन मीरा क्लीन फ्युल्स् ली.अंतर्गत,स्वयंपूर्ती प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन करतात म्हणजे हा शासकीय प्रकल्प (Gov.Project)असावा अशी चर्चा उपस्थित शेतकऱ्यांच्यात होती"
फोटो : शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील मनोगत व्यक्त करताना व्यासपीठावर सर्व शासकीय आधिकारी व राजकीय पदाधिकारी .
Post a Comment