पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था : दिघी नाका ते तोंडसुरे पर्यंतची वाट बिकट



म्हसळा ( निकेश कोकचा )
पर्यटन स्थळ दिवेआगरला जोडणार्‍या व म्हसळा शहरातून जाणार्‍या दिघी नाका ते तोंडसुरे या राज्यमार्गाची दुरावस्था झाली आहे.या मार्गावर रस्ता कमी आणि खड्डे जास्त प्रमाणात असल्याने वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील म्हसळा शहरात दिघी नाका ते तोंडसुरे हा रस्ता येतो.श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या पर्यटन स्थळाला दरवर्षी पर्यटक भेट देत असतात.दिवेआगर येथे जाण्यासाठी हा मार्ग महत्वाचा आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी,बोर्ली व म्हसळा तालुक्यातील अनेक गावांची वर्दळ या रस्त्यावरून होत असते. मात्र मागील काही वर्षापासून दिघी पोर्टची बेकायदेशीर रीत्या वाहतूक सुरू असल्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावे लागते.या या रस्त्यावरून प्रवास करणार्‍या नागरिकांमध्ये मानदुखी,कंबरदुखी व मणक्याच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे.हा रस्ता तात्काळ दुरुस्त केला नाही तर शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सहसचिव अमित महामुणकर यांनी दिला आहे.


दिघी नाका ते तोंडसुरे व दिघी नाका ते न्यू इंग्लिश स्कूल या  रस्त्याची अवस्था बिकट झाली असून या रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांचा खुळखुळा होत आहे.आधीच महागाई त्यात वाहन दुरुस्तीचा खर्च परवडणारा नसून हा रस्ता तात्काळ दुरुस्त केला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आंदोलन करू.
-अमित महामुणकर,सह सचिव अवजड सेना

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा