महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी साहित्यसंपदा कडून विविध मार्गदर्शनपर वर्गांचे अयोजन.


टीम म्हसळा लाईव्ह
कोविडचा दबाव मनाला नाउमेद करत असताना समाजाला आनंदाचे चार क्षण देता यावेत .आनंद घेता देताना समाज प्रबोधन व्हावे हा शुद्ध हेतू मनात ठेवून ,येणारी नवरात्र मोठ्या उत्साहात अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येत आहे . साहित्यसंपदा  समूह संस्थापक वैभव धनावडे ह्यांच्या  संकल्पनेतून  नवरात्र काळात महिला विशेष उपक्रम साजरा होत असून , "मी आत्मनिर्भर " ह्या उपक्रमाची घोषणा समूह प्रवक्ते मंजुळ चौधरी ह्यांनी नुकतीच केली.आत्मनिर्भर होण्यासाठी शाररिक ,आर्थिक ,मानसिक बळ गरजेचे असते हे हेरून  विविध मार्गदर्शनपर वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे . आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक बाबींचे ज्ञान व्हावे म्हणून महिलांना मार्गदर्शनासाठी "बचत गट कार्य आणि व्यवसाय  पद्धती " विषयावर  मुस्कान झाटम ह्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे .टिफिन किंवा केटरिंग व्यवसाय करताना ,."कोविड आणि अन्नव्यवसाय" विषयाचे मार्गदर्शन अनुपमा पाटील (Assistant commissioner food and drug administration) करणार आहेत .आजकाल स्त्रियांचा कल ऑनलाईन व्यवसाया कडे वाढत असताना तो कश्या पद्धतीने करावा ह्याचे मार्गदर्शन लाभणार आहे .  
  आहाराचा आपल्या मौखिक आरोग्याशी असलेला संबंध डॉ.अस्मिता कदम उलगडणार असून ,दातांची निगा योग्य पद्धतीने कशी राखावी ह्या बद्दल मार्गदर्शन करणार आहेत. रजोनिवृत्तीच्या समस्या प्रत्येक स्त्रीला सतावत असतात अश्या दिवसांना सामोरे जाताना कोणती काळजी घ्यावी ह्याचे मार्गदर्शन डॉ. अंकिता शिरकांडे करणार आहेत . तसेच शाररिक ताण तणावांना सामोरे जाताना मनोबल कसे राखावे विषयावर सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ . सोनाली मनीष वनगे ह्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे .
स्त्रियांना आर्थिक ,मानसिक आणि शाररिक सबळीकरणासाठी सदर मार्गदर्शनपर वर्ग नक्कीच फायद्याचे ठरतील . विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मिळणारे मार्गदर्शन नव्या पिढीला नक्कीच मोलाचे  ठरणार आहे .  
नवरात्री दरम्यान साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणदिनाचे औचित्य साधून, साहित्यसंपदा आयोजित २१ दिवस सलग पुस्तक परीक्षण उपक्रम साखळी पद्धतीने पार पडत असून महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे .महिलांना वाचण्यास प्रोत्साहन देणाऱ्या "पुस्तक संजीवनी " उपक्रमाची सांगता काव्यवाचन,कथावाचन ,वृत्तपत्रवाचन उपक्रमाने  होणार आहे.महिलांच्या नाट्य कलागुणांना वाव मिळावा म्हणून एकपात्री अभिनय स्पर्धा सुद्धा पार पडणार आहे .एकपात्री स्पर्धेसाठी कमाल ५ मिनिटांचा कालावधी असून विजेत्यांना रोख रक्कम ,प्रमाणपत्र आणि कै. सुरेंद्र बालंखे स्मृती चषक प्रदान करण्यात येणार आहे .

                               नवरात्रीतील नऊ दिवस विविध विषयांवर मिळणारे मार्गदर्शन नक्कीच महिलांना आत्म निर्भर होण्याच्या वाटेवर उपयुक्त पडेल असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे . सर्व कार्यक्रम विनामूल्य असून ,साहित्यसंपदा फेसबुक समूहावर लाईव्ह पार पडणार आहेत . उपक्रम समन्वयक म्हणून वंदना मत्रे ,सलोनी बोरकर काम पाहणार असून सहभाग नोंदणीसाठी किंवा  अधिक माहितीसाठी ९९३००८०३७५ क्रमांकावर संपर्क करावा . "पुस्तक संजीवनी " उपक्रमातील सर्व सहभागींना आकर्षक इ प्रमाणपत्र मनोमय मीडिया ह्यांच्या तर्फे देण्यात येईल .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा