राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता मानवी हक्क प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई पत्रकार भवन येथे मैत्री संस्था आणि संकल्प संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक कार्यकर्ता मानवी हक्क शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ. जी. जी. पारिख ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तसेच संस्थापक युसुफ मेहेर अली सेंटर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार आणि कामगार नेते भाई जगताप, सदभावना संघाच्या समन्वयक वर्षाताई विद्या विलास, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते तसेच कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विनोद हिवाळे अध्यक्ष संकल्प संस्था आणि सूरज भोईर अध्यक्ष मैत्री संस्था उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य हेतू समाजामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी कार्यकर्ता घडवणे. त्या कार्यकर्त्याला समाजातले सामाजिक प्रश्न काय आहेत याची जाणीव करून देणे. ते प्रश्न सोडवताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून कुठले गुण असावेत, कार्यकर्त्याचे तत्व काय आहे, मूल्य काय आहे, कार्यकर्ता म्हणून कोणते संविधानिक कार्य कसे करावे, संवाद कौशल्य, लेखन कौशल्य, गटकार्य, नेतृत्वगुण, विविध मानवी अधिकारां बद्दलची माहिती, महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणा याबाबत माहिती तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच काही संस्थांमध्ये शैक्षणिक भेट घडवण्तात येणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम १२ ते १५ आठवडे असून दर रविवारी १० ते ५ वाजेपर्यंत असणार आहे.
उपस्थिती पाहुण्यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन करून कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. हे प्रशिक्षण शिबिर पूर्ण करून कार्यकर्ता खऱ्या अर्थाने समाजाच्या विकासाचा दृष्टीने कार्य करण्यास प्रेरित होईल असा आमचा विश्वास आहे. सदर प्रशिक्षण घेण्याकरिता प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणात नावनोंदणी केली आहे.
कार्यक्रमाचे प्रसंगानुरूप सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी त्यांच्या खास शैलीत केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा