सी.एस.आर. जे.एन.पि.टी मुंबई व जन शिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून अलिबागेत काजू उत्पादन प्रकल्प सुरु करण्यास प्रोत्साहन.
टीम म्हसळा लाईव्ह
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान योजनेत कार्य करत असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील चौल भाटगल्ली येथे काजू उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या इच्छुक प्रशिक्षणार्थीसाठी सी.एस.आर. जे.एन.पि.टी.- मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातून काजू उद्योग प्रक्रिया हे १५ दिवसीय व्यवसाय प्रशिक्षण व कौशल्यवृद्धी कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी चौल भाटगल्ली अलिबाग येथे संपन्न झाले.
सदर १५ दिवसाच्या कार्यशाळेमध्ये काजू संकलनापासून ते पॅकिंग व विक्री व्यवस्थापन आदी सर्व विषयांवर सखोल प्रात्यक्षिक व मार्गदर्शन श्री. राहुल जाधव व सहकारी श्री. राजू टिवलेकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.
व्होकल फॉर लोकल" प्रशिक्षण कार्यक्रमात यावेळी स्थानिक युवकांना व युवतींना काजू प्रक्रियेद्वारे आपला स्वयंरोजगार प्राप्त होण्यासाठी याप्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे.
संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत कार्यक्रम राबवित असतांना या कार्यक्रमाच्या शुभ प्रसंगी संचालक श्री विजय कोकणे, मुख्य प्रशिक्षक श्री. राहुल जाधव व सौ. अक्षता जाधव, सहकारी श्री. राजू टिवलेकर, उद्योजक हर्षदा म्हात्रे व हरेश म्हात्रे, प्रमुख अतिथी श्री. दिगंबर मोरे, प्रशिक्षिका सौ. अपर्णा मोरे, जन शिक्षण संस्थान रायगडच्या कर्मचारी सौ. प्रतिक्षा सचिन चव्हाण (अकाउंट मॅनेजर) व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला.
Post a Comment