रयतेचा कैवारी "या शैक्षणिक डिजिटल दैनिकाच्या मार्फत दिला जाणारा या वर्षीचा गुरू गौरव पुरस्कार रायगड जिल्हयातील ४३शिक्षकांना आणि एका विद्यार्थाला प्रदान : म्हसळयातील ३ प्रा.शिक्षकांचा समावेश
(म्हसळा प्रतिनिधी)
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथून प्रकाशीत होणाऱ्या "रयतेचा कैवारी"या शैक्षणिक डिजिटल दैनीकाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यतील शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ४३ प्राथमिक शिक्षकांचा व एका विद्यार्थाचा सन्मान मंगळवार दि१९ ऑक्टो.रोजी महाड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे संपन्न झाला. यावेळी महाडचे आमदारभरतशेठ गोगावले ,महाड नागर परिषदच्या नगराध्यक्षा स्नेहलता जगताप, महाड प.स.सभापती मालुसरे मॅडम,रयतेचा कैवारीचे मुख्य संपादक शाहू संभाजी भारती, कार्यकारी संपादक मिट्टू आंधळे, रायगड जि.प सदस्य कचरे साहेब, काळीज कारसाहेब,राज्य अध्यक्ष राजेशजी सुर्वे व अन्न मान्यवर उपस्थित होते. यावेळी रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ४३ प्रा शिक्षक आणि गोरेगांव येथील ना.म. जोशी विद्यालयातील विद्यार्थी भावित सुविधा -चंदन तोडणकर या विद्यार्थाचा सत्कार व त्याना पशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.४३ शिक्षकांमध्ये म्हसळा तालुक्यातील राजीप शाळा बागाची वाडी येथील अशोक सहाणे, चिखलप आदिवासी वाडी शाळा येथील दिलीप शिंदे,आगरवाडा प्रा.शाळा येथील नितिन रामभाऊ गर्जे या ग्रामिण भागांत सेवेत सक्रीय शिक्षकांचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला रयतेचा कैवारी महाड तालुका प्रतिनिधी बालाजी गुबणारे यांनी व त्यांच्या टीमने कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट केले होते.
Post a Comment