मोटर सायकल चोरली एक : पोलीसानी हस्तगत केल्या चार मोटर सायकल
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरातील नवेनगर परिसरांतील प्रा.आ.केंद्र परिसरां तून प्रदीप तानाजी काळोखे यांची काळ्या- निळ्या रंगाची हिरो होंडा स्पेंडर मोटर सायकल क्रं. MHO6AD 9614 दिं१५.१०.२१ रोजी चोरीला गेली. म्हसळयाचे आभ्यासू स.पो.नी.उध्दव सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा /८४७ संतोष चव्हाण यानी तपासाची दिशा C.c.TV फूटेजचा अभ्यास करून नक्की केली आणि केवळ दोन दिवसात चोरीतील मोटरसायकल हस्तगत केली व सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या चव्हाण यानी आरोपीला पोलीस खाक्या न दाखवता वेगळ्याच तंत्राने जवळीक केली असता त्यानी महाड, पुणे येथून चोरून आणलेल्या अन्य तीन चोरलेल्या मोटर सायकलची माहीती चव्हाणना दिली. तात्काळ म्हसळा पोलीसानी दोन स्पेंडर क्रं MHO6GN.5319, MH12 BY6615, व एक हिरो होंडा पॅशन , MHO6AU2065 अशा रु४२ हजार किमतीच्या चार मोटर सायकल व म्हसळा शहरानजीकच्या सुरई गावाचा २७ वर्षीय अट्टल चोरटा ताब्यात घेतला आहे.
"तपासी अमलदार संतोष चव्हाण याना पो. ना. १३०३ जाधव, पोशी १०४३ हंबीर, पो.शी ५३७ खाडे, चापोशी २२५५ फोपसे यानी उत्कृष्ट साथ दिली"
"हजरजबाबीपणे म्हसळा पोलीसानी केलेल्या तपासाचे तालुक्यात कौतुक होत असून व अन्य चोऱ्यांचा तपास लौकरच लागेल याकडे तालुक्यातील जनता लक्ष ठेऊन आहे".
Post a Comment