माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांच्या दौऱ्यानंतर म्हसळा शेकापमध्ये नवचैतन्य.



म्हसळा वार्ताहर :- श्रीवर्धन मतदार संघाचे संपर्क चिटणीस अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी नुकताच म्हसळा तालुक्याचा झंझावती दौरा केला. यामुळे शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून तालुक्यात पक्षाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी  कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.

म्हसळा दौऱ्यात पंडित पाटील यांनी पांगलोली नळपाणी योजनेचा  प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद आस्वाद पाटील यांचे लक्ष वेधुन पांगलोली पाणी टंचाई सोडविण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष  सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले.

तोराडी परिसरातील मोबाईल नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी म्हसळा तहसीलदार व बीएसएनएल अधिकारी यांच्याकडे चर्चा करून ग्रामस्थांच्या अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. तोराडी कब्रस्तान रस्ता, प्राथमिक शिक्षक उपस्थिती यासारख्या अनेक विषयांवर म्हसळा गटविकास अधिकारी चर्चा करून   तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी पंडीत पाटील यांनी खरसई, वरवटणे, पेढाबे या गावांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यामुळे शेकाप सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचं काम करणारा पक्ष म्हणुन पुन्हा ताकदीने उभा राहत असल्याने पक्षातील नव्या जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील व माजी आमदार पंडित पाटील यांच्या मार्गदरशनाखाली अनेक प्रलंबित विषय मार्गी लागत असल्याने भविष्यात म्हसळा तालुक्यात पक्षाला जनादेश लाभेल असा विश्वास तालुका युवक अध्यक्ष निलेश मांदाडकर यांनी व्यक्त केला.

 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा