मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पोवाड्याच्या माध्यमातून तळागाळातल्या शोषित वंचित घटकांमध्ये ज्ञानप्रबोधन करून जनजागृती करणारे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृती चिरंतन जागृत रहाव्यात आणि त्यांचं सुंदर स्मारक असावं, या संकल्पनेतून सुप्पारक बुद्ध विहार, चेंबूर, मुंबई येथे "महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी गौरव समिती"ची स्थापना करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी नटवरलाल खरे, उपाध्यक्ष भगवान बनसोडे, सचिव सूरज भोईर यांची एकमताने निवड करणयात आली. तसेच शासन दरबारी या समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करून वामनदादा कर्डक यांचं सुंदर स्मारक व्हावं यासाठी ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीला विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
Post a Comment