भाज्यांचे भाव भिडले गगनाला.महीलांचे आर्थिक बजेट कोलमंडले. संसारगाडा कसा हाकायचा गृहिणींपुढे मोठे आव्हान.
तळा-किशोर पितळे
सध्याच्या काळात सर्वच वस्तूंचे भाव वाढले असतानाआता दैनंदिनलागणाऱ्या भाज्यांचे भाव देखील गगनाला भिडले आहेत.त्यामुळे घरखर्च चालविण्याचे गृहिणींपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.यावर्षी सुरुवातीला दमदार कोसळलेल्या पावसाने परतीच्या वेळी देखील धुमाकूळ घातल्याने शेतामध्ये असलेला भाजीचा माल मोठ्या प्रमाणावर कुजला आहे.परिणामी भाज्यांची आवक कमी प्रमाणात होत असल्यामुळे भाजी मंडईत भाज्यांचे भाव चांगलेच वधारले आहेत.घाऊक व्यापाऱ्यांना पूर्वी पेक्षा जास्त किमतीने भाज्यांची खरेदी करावी लागत असल्याने परिणामी बाजारपेठेत किरकोळ भाज्यांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. गॅस सिलेंडर,ओली, सुखी मच्छी, किराणा सामान यांच्या किमती आधीच भडकलेल्या असताना आता बाजार पेठेतील भाज्यांच्या वाढलेल्या दरामुळे गृहिणींना घरखर्च चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोना काळात काहि जणांच्या नोकरी व्यवसायावर कुर्हाड घातली आहे तर निसर्गाने सर्वांनाच दगा दिला आहे. ग्रामीण भागात शेती हा एकमेव व्यवसाय आहे. मोल मजूरी मिळत नाही अशी परीस्थिती आहे.यापूर्वी बाजारपेठेत गावठीभाज्यांची आवक मोठ्याप्रमाणावर होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना या भाज्यांचा मोठा आधार होता. परंतु परतीच्या पावसाचा गावठी भाज्यांना मोठा फटका बसला असून भाज्या कुजल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
सध्या बाजारात असलेल्या भाज्यांचे दर पुढील प्रमाणे
मटार=२०० रू. कोबी=३० रु..फ्लॉवर = ८०रू. वांगी=८० रु.टोमॅटो=८०रू. शिमला मिर्ची=८०रू. गवार =८० रु. घेवडी=८० रु. कोथिंबीर= ५०/६० रु.जुडी. मेथी=३० रु. जुडी. फरसबी=८०रु. गाजर=६०रु. किलो असे दर गगनाला भिडले असून महीलांना संसार गाडाकसा हाकायचा मोठी कसरत करावी लागत आहे.
Post a Comment