म्हसळा तालुक्यात एकवीस सार्वजनिक तर नऊ खाजगी दुर्गामातेची प्रतिष्ठापना



म्हसळा (बाबू शिर्के)
आदिशक्तीचा जागर म्हणजे नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. म्हसळा तालुक्यात एकवीस ठिकाणी सार्वजनिक तर नऊ ठिकाणी खाजगी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. या सर्व मंडळांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार,  उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे सण-उत्सवांच्या आनंदावर विरजण आले असले तरी, उत्साह, भक्ती, श्रद्धा कमी झालेली नाही. मात्र काहीशी सार्वजनिक स्वरूपात आनंद व्यक्त करण्याची मजा हिरावली आहे. दरवर्षी असणारा लखलखाट, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी यंदा नसेल. यंदाचा उत्सव हा पूर्णत: मंडळांच्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादित आहे. भाविकांनी गर्दी करू नये,या उत्सवादरम्यान रक्तदान शिबिर, भजन, कीर्तन करावे ,बँडबाजा, ढोल-ताशाशिवाय देवीचे आगमन आणि विसर्जन करावे. गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक शिबीरं आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.असे आव्हान सहायक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी तालुक्यातील सर्व मंडळाच्या अध्यक्षाच्या बैठकीत केले.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा