- रास्त मागणीकडे महसुल विभागाचे दुर्लक्ष
- तालुक्यातील १७ गावे जोडली आहेत तीन पोलीस स्टेशनला.
संजय खांबेटे : म्हसळा
ग्रामिण भागातील नागरिकांची मुलकी (महसुल) व पोलीस प्रशासना जवळ सलग्नता असावी कायदा- सुव्यवस्था राखण्यात सुसूत्रता व गतीमानता असावी या उद्देशाने तालुका तेथे पोलीस स्टेशन असे शासनाने धोरण निश्चित करुन म्हसळा तालुक्यासाठी पोलीस स्टेशनची निर्मिती केली परंतु म्हसळा तालुक्यातील ८२ महसुली गावांपैकी १७ महसुली गावे दिघी सागरी,गोरेगाव व श्रीवर्धन या तीन पोलीस स्टेशनला जोडली आहेत.त्यामुळे नागरिका ना अडचणीचे होत आहे.
तालुक्यातील तुरूंबाडी , रोहीणी, आडी ठाकूर, गोंडधर, काळसुरी, खानलोशी ही ४१६४ लोकसंखेची ६ गावे दिघी सागरी पोलीस स्टेशनला, आंबेत, तोराडी, लिपणी, वावे, महमद खानीखार, गडदाब, विचारे वाडी, आमशेत, फळसप, संदेरी ही ५०३४ लोकसंखेची १० गावे गोरेगाव पोलीस स्टेशनला व आडी महाड खाडी हे ४९१ लोकसंखेचे एक गांव श्रीवर्धन पोलीस स्टेशनला जोडले आहे. तालुक्यातील या १७ गावांतील ९६८९ नागरिकाना गैरसोयीचे होत आहे. १७ गावातील लोकाना आप- आपसातील वाद व किरकोळ तक्रारी करण्यासाठी तालुका पोलीस स्टेशन सोडून अन्य पोलीस स्टेशनला जावे लागते, तर प्रतिबंधात्मक कारवाई साठी पुन्हा तालुका मुख्यालयांत यावे लागते. हे नागरिकाना व प्रशासनाला खर्चिक व वेळकाढू पणाचे होते.
अशाच पद्धतीची अडचण तालुक्यात व गावागावांत शांतता व सुव्यवस्था राबविणा ऱ्या पोलीस पाटीलाना होत असते. पोलीस पाटीलाना शांतते बाबतची व गुन्ह्याची माहीती संबधीत पोलीस स्टेशनला व सुव्यवस्था (साथ व जलजन्य रोग, दुष्काळ, पाणी टंचाई ) या विषयीची माहीती महसुल प्रशासनाला द्यावी लागते. पोलीस पाटीलां ची नेमणूक उपविभागीय अधिकारी(प्रांत) यांच्या मार्फत होत असते. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिक व पोलीस पाटीलाना त्रास होतो.निवडणूकीच्या काला वधीत नागरिकाना सभा/मिरवणुका काढणे या संर्दभात संबधीत पोलीस स्टेशनला अर्ज द्यावा लागतो, तर तालुक्यांत नेमलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा/मिरवणुकांसाठी ना हरकत घ्यावी लागते राजकीय दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांचा वेळ व खर्च वाढतो. यासाठी तालुक्यातील १७ महसुली गावे म्हसळा पोलीस स्टेशनला तात्काळ सलग्न करावी ही मागणी नागरिक,राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सतत करीत असतात.
"सन १९-२० मध्ये महाड विधानसभा मतदार संघातील माणगाव तालुक्यातील म्हसळा पोलीस स्टेशनला सलग्न असणारे गोवेले हे गाव ग्रामस्थांचे मागणीनुसार गोरेगाव पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आले. त्याच पध्दतीने म्हसळा तालुक्यातील १७ गावे म्हसळा पोलीस स्टेशनला सलग्न करावी"
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता आंबेत खाडी पट्टा.
"राज्याचे गृह व पोलीस प्रशासन भारतीय दंड संविधान, भारतीय पुराव्याचा कायदा, फौजदारी कार्यपध्दती यांच्या चौकटीत कार्य करीत असताना शासन नागरिकांच्या सोयीना विशेष महत्व देत असते, सर्वसाधा रणपणे १ लक्ष लोकसंखेसाठी एक पोलीस स्टेशन किंवा तालुक्यासाठी एक पोलीस स्टेशन असे निकष आहेत. म्हसळा तालुक्या ची २०११ च्या जनगणनेनुसार ५९ हजार ९४१ लोकसंख्या आहे. म्हसळा पोलीसानी नागरीकांची मागणीचा शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे."
-महादेव पाटील, माजी सभापती.
Post a Comment