अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या जबाबदारी मध्ये कधीच कमी राहिल्या नाही : ना.अदिति तटकरे




म्हसळ्या मध्ये अंगणवाडी व बचत गटांना विविध  प्रकारचे उपयोगी वाटप 

म्हसळा(बाबू शिर्के)

मुख्यमंत्री यांच्या द्वारे माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम अंतर्गत आशा,अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे.गेल्या दीड वर्षापासून अंगणवाड्या आपल्या इमारती मध्ये कार्यरत नसल्या तरी माझ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या जबाबदारी मध्ये कधीच कमी राहिले नसल्याचे आदरपूर्वक वक्तव्य जिल्हयाचा पालक मंत्री अदिति तटकरे यांनी केले आहे.

शनिवार दिनांक 2 म्हसळा शहरतील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित तालुक्यातील सर्व अंगणवाडी केन्द्र् व बचत गटासाठी ठेवण्यात आलेल्या साहित्य वाटाप कार्यक्रमात पालकमंत्री यांनी हे वक्तव्य केले.यापुढे त्यांनी येत्या काळात  होतखोरू महिला बचतगटांनी काम करावे.एखादा बचतगट लोणचे पापड बनवत असेल तर त्या बचत गटाला पापड बनवण्याची मशीन देण्यात यावी.जे महिला बचत गत ज्या क्षेत्रात काम करत आहे त्यांना त्या प्रकारचे साहित्य देण्यासाठी जिल्हा परिषदे तर्फे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणार असल्याचे यावेळी तटकरे यांनी संगितले. या कार्यक्रमात एकूण 118 अंगांवाड्याना साहित्य,लहान मुले असणार्‍या माताना उपयोगी वस्तु व 14 बचत गटांना दळण मशीन,भजनी मंडळ साहित्य पापड मशीन व सतरंजीचे वाटप करण्यात आले.

यावेळी महिला व बालकल्याण सभापति गीता जाधव, पशू व सवर्धन सभापती बबन मनवे, म्हसळा सभापती छाया म्हात्रे, उप सभापती संदीप चाचले, सदस्य ऊज्वला सावंत, मधु गायकर, आपलसंख्यक जिल्हा अध्यक्ष नाजिम हासवारे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, प्रांताधिकारी अमित शेडगे, एकात्मिक बाल प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे, स.पो.नि. उद्धव सुर्वे, नगर अध्यक्षा जयश्री कापरे, महिला तालुका अध्यक्षा रेश्मा कानसे, राष्ट्रवादीचे पाभरा गण उपाध्यक्ष गजानन पाखाड व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा