म्हसळा तालुक्यातील पशुधनाची होत आहे हेळसांड : केवळ २ पशुधन पर्यवेक्षक ४ शिपाई करीत आहेत तालुक्यातील पशुधनाची सेवा.
पशुधनाकडे शासनाचे दुर्लक्ष.
संजय खांबेटे : म्हसळा
पशुसंवर्धन विभागाचा शेतकऱ्यांशी थेट संबंध येत असल्याने या विभागातील प्रत्येक पद अत्यंत महत्वाचे आहे. तालुक्यात पशुधनाची सक्षम जोपासना व्हावी म्हणून पशुसंवर्धन विभागाने तालुक्याच्या भौगोलिक रचनेनुसार ८० गावांसाठी म्हसळा येथे पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी १, तालुक्यात मेंदडी, खामगाव व संदेरी या तीन पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी २ कार्यरत केले.आज मितीला तालुक्यात २०१९-२० च्या पशुगणने नुसार गाय व म्हैसवर्गीय शेळी व मेंढीअसे१२ हजार ७३२ पशुधन आहे आणि केवळ २पशुधन पर्यवेक्षक व ४ शिपाई लसीकरणासह सर्व सेवा देत असल्याची माहीती पुढे येत आहे.मेंदडी,खामगाव व संदेरी, आंबेत,वारळ,काळसुरी,गोंडघर,तळवडे, कोंझरी या तालुक्यातील सर्व परिसरां तील शेतकऱ्यांची गुरांच्या प्राथमिक व गंभीर आजाराबाबत हेळसांड होत आहे असे सर्वसाधारण शेतकऱ्यांच मत आहे.
तालुक्यातील शेतीला प्रमुख पूरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व असंख्य शेतमजूराना रोजगार उपलब्ध करून देणारा तालुक्यातील पशुपालन व्यवसाय सध्या धोक्यात आला आहे. जिल्ह्यांत व तालुक्यात मोठ्या संख्येने दुभती जनावरे असताना देखील त्यांच्यावर उपचाराची मात्र प्रभावी यंत्रणा शासन दरबारी उपलब्ध नाही.पशुसंवर्धन विभागाचा शेतकऱ्यां शी थेट संबंध येत असल्याने या विभागा तील प्रत्येक पद अत्यंत महत्वाचे आहे. परंतु या विभागात पशुधन अधिकाऱ्यां ची बरीच पदे रिक्त आहेत.राज्यात जवळ पास ९०६ पदे रिक्त आहे तर रायगड जिल्ह्यात तब्बल ५० टक्केपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.
"तालुक्यात सुमारे ५०ते ६० पशुपालक व दुग्ध व्यवसायीका आहेत,पशुसंवर्धन विभागातून मिळणाऱ्या तुटपुंजा सेवेतून गावे, गरीब, शेतकरी, शेती आणि त्यासंबंधीत दुग्ध व्यवसायीक उद्योगाला मुख्य प्रवाहात आणून भारताचे उद्याचे स्वप्न साकर होऊ शकेल का? शेतकरी, पशुपालकांचे पशुधन विकास होण्या साठी पायाभूत सुविधांची खऱ्या अर्थाने गरज आहे."
प्रकाश रायकर,तालुका अध्यक्ष भाजपा म्हसळा व दुग्ध व्यवसायीक
पशुधन विकासअधिकाऱ्यांच्या निवृत्ती आणि पदोन्नत्यां मुळे अनेक जागा रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ त ही पदे भरली जातात.मात्र गेल्या सहा वर्षांपासून भरती प्रक्रिया झाली नाही, जिल्हा पातळीवर खाजगी मानधन तत्वावर भरती होणे आवश्यक आहे".दुग्ध व्यवसायीक, खामगाव
"जिल्ह्यात पशुधन विकास अधिकारी वर्ग १ची २८ पदे गेले काही वर्ष रिक्त आहेत ,राज्यात सुमारे ९०० पदे रिक्त आहेत, शासनाकडून तातडीने भरती प्रक्रीया होणे आवश्यक आहे".
बबनशेट मनवे, सभापती.
कृषि पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती. रायगड जिल्हा परिषद,अलिबाग.
Post a Comment