तळा :किशोर पितळे
देशात १सप्टेंबर १९५९साली इंडियन आँईल कंपनीची स्थापन करण्यात आली असून या केंद्र सरकारची अधिक नफा देणारी कंपनी असुन ६२ वर्ष झालीआहेत त्यानिमित्ताने संपूर्ण देशात वर्धापन दिन साजरा केला जात आहे.तळा शहरातील पहिलाच एकमेव पेट्रोल पंप आहे. श्रीचंडीका पेट्रोलियम पंपावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून व चाँकलेट वाटून साजरा करण्यातआला. यावेळी नायब तहसीलदार स्मिता जाधव, महसूल तहसीलदार सुजाता घुले, मालक समीर तळकर, परशुराम तळकर, तलाठी प्रविण गवई, मंडळ अधिकारी संजय ठाकर भाजप प्रदेश अध्यक्ष रविभाऊमुंढे नगरसेवक चंद्रकांत रोडे शेकाप चिटणीस धनराज गायकवाड राकेश नांदगावकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश खोत पोलीस हवालदार संजय शिंदे सर्णेकर महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment