तळा: किशोर पितळे: गुरुवार दिनांक ०२ सप्टेंबर रोजी नियोजित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तळा या संघटनेच्या कार्यकर्त्यांची सह विचार सभा संपन्न झाली.या सभेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तळा तालुका शाखाअध्यक्षपदी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, शेकाप सरचिटणीस, युवा नेते धनराज गायकवाड यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदर सभेची अध्यक्षता शाखा अध्यक्ष धनराज गायकवाड यांनी केली. प्रमुख मार्गदर्शक जिल्हा कार्याध्यक्ष विनय कुमार सोनावणे उपस्थित होते.सभेच्या सुरवातीला डॉ भगवान लोखंडे यांनी सभेच्या विषय पत्रिके नुसार संस्थेच्या असणाऱ्या अपेक्षा व शाखा विस्तार या संदर्भात मांडणी केली. विनय कुमार सोनवणे यांनी तळा शाखा अधिक कृतिशील होऊन आपली ओळख निर्माण करेल.यासाठी 2 ते 5 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या शिबीरात सर्वानी सहभागी व्हावे.अशी अपेक्षा व्यक्त केली.अध्यक्ष धनराज गायकवाड यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कार्य विस्तारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे,संघटना व विचार विस्तारात सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा संकल्प व्यक्त केला.उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड,प्रा.कसबे,श्री.शिगवण,श्री.मंगेश थिटे यांनी ही सदिच्छा व्यक्त केल्या.सभेचे संचलन व आभार डॉ दत्ता कुटेंवाड यांनी पार पाडले.
Post a Comment