(म्हसळा प्रतिनिधी)
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील (एनआरएचएम) जिल्ह्यातील १३ आरोग्य सेविकाना कार्यमुक्त करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यानी नुकतेच दिले आहेत.त्यामुळे आरोग्य विभागात १०ते १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचा- ऱ्यांवर अन्याय झाला आसल्याची जन- मानसात समज आहे.कोरोना काळातही त्यानी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली होती अशीही चर्चा सर्वसामा न्यांच्यात आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंर्तगत २०२१-२२ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात आरोग्य सेविकांची २१ पदे कमी करण्याचे आदेश आहेत. त्याप्रमाणे ज्या उपकेंद्रात वर्ष भरात एकही प्रसुती झाली नाही त्या १३ उपकेंद्रातील आरोग्य सेविकांची पदे प्राधान्याने रिक्त करण्यात आल्याचे समजते. यामध्ये श्रीवर्धन मतदार संघात सर्वात जास्त म्हणजे ७आरोग्य सेविकां ची पदे रिक्त झाली ती पुढील प्रमाणे म्हसळा ३ ( उपकेंद्र जांभूळ,तळवडे व नेवरूळ), श्रीवर्धन १(आदगाव), तळा १ (मांदाड), माणगाव १(देवळी),रोहा १ (भालगाव) अन्य पुढील प्रमाणे मुरुड ४(वाळवटी,वळके,आगरदांडा,महालोर) आलिबाग१(आग्राव) पेण १(दादर), अशी कार्यमुक्त केलेली उपकेंद्र आहेत.
" बहुतांश आरोग्य सेविकांची पदे केंद्र सरकारने आरोग्य विभागासाठी २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविण्यास सुरवात केली त्या काळाती ल आहेत, याच आरोग्य सेविकानी ग्रामीण भागातील गरीब महिला आणि मुलांपर्यंत गुणवत्तापूर्ण, अद्ययावत व परिणामकारक आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात पोचविण्याचे मिशनचे ध्येय पूर्ती केली, तसेच अर्भक मृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी करणे, सार्वजनिक स्वच्छता, पोषक आहार, पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सेवांबाबत सार्वजनिक आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध करून देणे, स्थानिक आरोग्य नियंत्रणाबरोबरच इतर संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध आणि नियंत्रण करणे, सर्व लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्याबाबत उपाय योजना आखणे, एकूण जननदर कमी करण्याची उद्दिष्ट्ये व गाठावयाची उद्दिष्ट्ये या अभियानातून राबविण्याचे कार्य उत्तम काम केले आहे त्याची प्रशासनाने नोंद घ्यावी "
"मे २०१४ ला ग्रामिण रुग्णालय म्हसळा कार्यान्वित झाल्यापासून म्हसळा प्रा.आ.केंद्राची अवस्था बिकट होती, ते योग्य आस्तित्वाने कार्यरत नसल्याने आणि कायमस्वरूपी म्हसळ्यासाठी वैयकिय आधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी नसल्याने तेथे प्रसूती होणार च कशा?त्यामुळे प्रशासनाच्या चुकीने झालेल्या गोष्टींची शिक्षा आरोग्य सेविकाना देऊ नये त्यांची पुर्ननेमणूक व्हावी"
-महादेव पाटील, मा. सभापती पंचायत समिती म्हसळा.
Post a Comment