मकरंद जाधव | बोर्लीपंचतन
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा म्हसळा संघटनेची सभा बुधवार दि.१ सप्टेंबर रोजी म्हसळा येथील सिध्दि हाॕटेल येथे कोरोना नियमावलीचे पालन करुन मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी म्हसळा तालुक्यातील रा.जि.प.प्राथमिक शाळा कणघर केंद्राचे केंद्र प्रतिनिधी पवन आडवळे यांनी सोनी वाहीनीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात भाग घेउन आपल्या बुध्दी चातुर्याने बारा प्रश्नांची अचुक उत्तरे देत साडेबारा लाख रुपये रक्क्म जिंकुन आपल्याबरोबरच आपल्या शाळेलासुध्दा नावलौकीक मिळवुन दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर गरीब गरजु आदिवासी मुलांचे शैक्षणिक पालकत्व पत्करुन करीत असलेल्या सेवाभावी कार्याबद्दल संघटनेचे तालुकाध्यक्ष नरेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद मोरे व सभासदांनी आपल्या मनोगतात पवन आडवळे यांच्या कार्याचे कौतुक करुन अशीच सेवा तुमच्या हातुन निरंतर घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या औचित्याने संघटनेच्या तालुका कोषाध्यक्षपदी अवधूत पवार यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सरचिटणीस आण्णासाहेब बिचुकले यांनी केले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा म्हसळा संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Post a Comment