म्हसळयात पादचाऱ्याला चारचाकी वाहनाची घडक : अपघातग्रस्ताला ग्रामिण रुग्णालयातून मीळाल्या जुजबी आरोग्य सेवा.



संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरात अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याला ठोकरल्याने हरीचंद्र तुकाराम कापसे वय ५२ रा.कापसे मुठवली हा पादचारी जखमी झाला,रस्त्यावर जखमी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला पादचारी पाहून त्याला अज्ञात रिक्षाचालकाने म्हसळा ग्रामिण रुग्णालयाचे पाहीरीवर शुक्रवार दिं.१०सप्टें रोजी सायंकाळी  सोडले,गणेश चतुर्थीची सुट्टी आसल्यामुळे रुग्णालयातील 0.P.D सेवा बंद होती.रेग्युलर सेवेतील वैद्यकिय आधिकारी उपलब्ध नव्हते, तर अत्यावश्यक सेवेसाठी नेमणुकीत असलेले वैद्यकिय अधिकारी हे गैरहजर असल्याने रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारीकेनी जुजबी इलाज करुन रुग्णाला घरी पाठविले. त्यामुळे म्हसळा ग्रामिण रुग्णालयातील सेवे बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह पुढे येत आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाणी आसणाऱ्या रुग्णाल याचे पाहीरीवर रुग्ण कसा टाकण्यात येतो, रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था नक्की कशी आहे, अत्यावश्यक सेवेसाठी असणारा वैद्यकिय अधिकारी गैरहजर का होता.या बाबतचे मुद्दे चर्चिले जात आहेत.सदर अपघात ग्रस्त हे  गोंडघर येथील आपल्या भाचीकडे गणेश चतुर्थी निमीत्त जात असताना अज्ञात वाहनाने त्याना उडविले आसल्याचे ग्रामिण रुग्णालयात आसणाऱ्या पोलीसानी सांगितले.तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांना ग्रामीण रुग्णालय मदत करते. त्यामुळे या सर्व ठिकाणांहून रुग्ण ग्रामीण रुग्णालयात रुग्ण येतात, रुगणालयांत दर्जेदार रुग्णसेवा मिळणे आवश्यक आहे आशी चर्चा आहे.

"प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्थानिक सदस्यांची एक सल्लागार समिती असतेच.रुग्ण कल्याण समिती किंवा रुग्णालय समिती या नावाने ती ओळखली जाते. रुग्णांना मदत करणे, उपलब्ध सेवांच्या प्रतीवर नियंत्रण ठेवणे,वैद्यकीय सामग्री ची दुरुस्ती करून घेणे अशा पध्दतीची कामे तसेच ग्रामीण रुग्णालयातील सेवा व स्थानिक नागरिक यांच्यात समन्वय साधला जातो. ही समिती तात्काळ गठीत होणे आवश्यक आहे"
महादेव पाटील ,माजी सभापती म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा