संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात सरासरी पर्जन्यमान झाले . आजपर्यंत ३६१० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे म्हसळा शहरातील गवळवाडी परिसरांतील सुनिल शांताराम म्हशीलकर यांचे घर क्रं.११५० चे भोवतालची कंपॉऊंड वॉल भूउत्तखलनाने कोसळल्याचे प्रभारी तहसीलदार के.टी.भिंगारे यानी सांगितले. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महसुल विभागाने म्हसळा नगरपंचायत व घरमालक सुनिल शांताराम म्हशीलकर याना सावधानतेचा इशारा दिला आहे. म्हसळा तलाठी कैलास पाटील व प्रभारीमंडलआधिकारी दत्ता कर्चे यानी तात्काळ धटना स्थळी भेट देऊन रहात असणारे कुटुंब महेंद्र म्हशीलकर यांचे सुरक्षित घरी स्थलांतरीत करण्यात आले आसल्याचे के.टी.भिंगारे यानी सांगितले.
फोटो.सुनिल शांताराम म्हशीलकर यांचे घरा भोवतालची कंपॉऊंड वॉल भूउत्तखलनाने कोसळल्याची पहाणी व पंचनामा करताना तलाठी कैलास पाटील
Post a Comment